पेठरोडला जुगार अड्डा उद्ध्वस्त

By Admin | Updated: September 9, 2016 01:21 IST2016-09-09T01:21:31+5:302016-09-09T01:21:43+5:30

पेठरोडला जुगार अड्डा उद्ध्वस्त

Petheradla wrecked gambling base | पेठरोडला जुगार अड्डा उद्ध्वस्त

पेठरोडला जुगार अड्डा उद्ध्वस्त

पंचवटी : पेठरोडवरील कर्णनगर परिसरात असलेल्या सूर्या आर्केड इमारतीच्या गाळ्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी छापा मारून तब्बल ११ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
कॅन्सर हॉस्पिटलमागे असलेल्या परिसरात मुन्ना गुप्ता नामक इसम पत्त्याचा जुगार चालवित असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना गुरुवारी सायंकाळी मिळताच गुन्हा शोध पथकासह पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणी चंद्रभान अहिरे, गोरखनाथ दोंदे, सचिन मोरे, सचिन गोसावी, पंकज गुजराथी, अरुण धंदुके, सागर लोंढे, शंकर खिच्ची, गणेश यादव, कल्याण शिंदे हे पत्त्यावर जुगार खेळताना आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या संशयितांची झडती घेत त्यांच्याकडून ६९ हजार रुपयांची रोकड, तसेच ४६ हजारांचे भ्रमणध्वनी व १ चारचाकी, ४ दुचाकी असा पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. गुन्हा शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेश इंगोले, शैलेंद्र म्हात्रे, आदिंनी कारवाई केली. (वार्ताहर)

Web Title: Petheradla wrecked gambling base