पेठरोडला तरुणावर वार
By Admin | Updated: March 20, 2016 00:11 IST2016-03-19T23:52:39+5:302016-03-20T00:11:20+5:30
पेठरोडला तरुणावर वार

पेठरोडला तरुणावर वार
नाशिक : दारूसाठी पैसे दिले नाहीत, या कारणावरून एका तरुणावर चाकूने वार केल्याची घटना गुरुवारी (दि़ १७) दुपारच्या सुमारास पेठरोडवरील नवनाथनगर परिसरात घडली़
पेठरोडवरील रूपेश चौधरी हा युवक चार वाजेच्या सुमारास नवनाथनगरमधून पायी जात असताना संशयित दीपक मधुकर गुंजाळ उर्फ काळ्या (रा़नवनाथनगर, पेठरोड, पंचवटी) याने दारूसाठी पैसे मागितले़ त्यास नकार देताच संशयित गुंजाळने चौधरीवर चाकूने वार केले़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)