पेठ तालुक्यातील महिलेची आत्महत्या
By Admin | Updated: June 21, 2017 00:03 IST2017-06-21T00:02:47+5:302017-06-21T00:03:31+5:30
पेठ तालुक्यातील महिलेची आत्महत्या

पेठ तालुक्यातील महिलेची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पेठ तालुक्यातील म्हसगण येथील विवाहितेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ हेमलता नरेंद्र जाधव (३७) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे़ म्हसगण येथील विवाहिता सोमवारी (दि़ १९) माहेरी आली होती़ रात्रीच्या सुमारास तिने बाथरूममध्ये जाऊन अंगावर रॉकेल ओतून घेत स्वत:ला पेटवून घेतले. यामध्ये गंभीर भाजल्याने नातेवाइकांनी तिला प्रथम पेठ ग्रामीण रुग्णालय व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.