पेठ तालुक्यातून त्र्यंबकेश्वरला दिंड्या रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 15:37 IST2020-01-16T15:37:00+5:302020-01-16T15:37:38+5:30
पेठ -श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथांच्या यात्रेनिमित्त पेठ तालुक्यासह गुजरात राज्यातून दिंडया मोठया प्रमाणावर टाळ मृदुंगाच्या गजरात त्र्यंबककडे प्रस्थान झाल्या आहेत.

पेठ तालुक्यातून त्र्यंबकेश्वर कडे रवाना झालेली दिंडीतील भावि क
ठळक मुद्दे श्री. सद्गुरू स्वानंद आत्मोन्नती भावडू महाराज बहुदेशीय संस्था खोकरतळे यांची केळविहीर ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडी अनेक वर्षापासून प्रस्थान करत असते. भावडू महाराज यांच्या आशिर्वादाने नामदेव मोंढे दिंडीचे नेतृत्व करतात.
हातात टाळ, डोक्यावर तुळस आणी भगव्या पताका फडकवत शेकडो वारकरी मुखी विठ्लाचा जप करत त्र्यंबकेश्वरी विसावतात. मजल दरमजल करीत दिंड्या गावागावात प्रबोधन, भजन, किर्तन, करीत कारकरी सांप्रदायाच्या पताका फडकवत असतात. सद्या पेठ तालुक्याच्या दरीखोरीत टाळ मृदूंगाचा गजर ऐकावयास मिळत आहे.