पेठ - दिंडोरीत तालुक्यात प्रचार शिगेला
By Admin | Updated: October 13, 2014 00:48 IST2014-10-12T22:00:52+5:302014-10-13T00:48:36+5:30
पेठ - दिंडोरीत तालुक्यात प्रचार शिगेला

पेठ - दिंडोरीत तालुक्यात प्रचार शिगेला
दिंडोरी : पेठ - दिंडोरी विधानसभा मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात प्रचार शिगेला पोहचला असून, यंदा कोणत्याही जाहीर आरोप-प्रत्यारोपाशिवाय निवडणूक रंगली असून, आमदार धनराज महाले, माजी आमदार नरहरी झिरवाळ, रामदास चारोस्कर यांच्यात काट्याची लढत असून, जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटात वेगवेगळी राजकीय समीकरणे बनली आहेत. जातीय समीकरणात मतदार कुणाचे स्वप्न साकार करतात अन् कुणाला घरी बसवतात याच्या पैजा लागू लागल्या आहेत. अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत दिंडोरीत अटीतटीची लढाई कायम असून, जातीपातीच्या राजकारणाने जोर धरला आहे. यंदा जाहीर आरोप प्रत्यारोपाऐवजी प्रत्येकाने मीच कसा विकास करू शकतो यावर भर देत आपली मतपेढी आतापर्यंत सांभाळली आहे.
तिन्हीही आमदारांकडे ठराविक मतांचा गठ्ठा असून, या मतांच्या फोडाफोडीवर एकमेक टपून असून, सर्वांनी राजकीय व्यूहरचना आखली आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहे. राष्ट्रवादीने शरद पवार, छगन भुजबळ काँग्रेसने राहुल गांधी, बाळासाहेब थोरात, तर शिवसेनेने रामदास कदम यांच्या सभा आयोजित करत वातावरण पेटवले आहे. शेवटच्या टप्प्यात उमेदवारांचे कुटुंबीयही मैदानात उतरले आहे.
मोठ्या गावांमध्ये प्रचार फेऱ्यांवर भर दिला जात आहे. या प्रमुख तीन प्रतिस्पर्ध्यांबरोबरच भाजपाचे अशोक बुरंगे मनसेचे सुधाकर रावूत माकपाचे दत्तू पाडवी यांनी ही प्रचारात कुठे कमी ठेवली नसून हे कुणाचे किती मते
खातात यावर बरेच काही अवलंबून आहे. मतदारसंघातील दिंडोरीच्या पूर्व भागातील व पेठ तालुक्यातील
मतदार कुणाला तारणार यावर
निकाल अवलंबून राहणार आहे. (वार्ताहर)