अखेरीस पेठला मिळाली रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:11 IST2021-06-01T04:11:58+5:302021-06-01T04:11:58+5:30
पेठ पंचायत समितीच्या आवारात सोमवारी (दि. ३१) जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे पूजन करण्यात आले. ...

अखेरीस पेठला मिळाली रुग्णवाहिका
पेठ पंचायत समितीच्या आवारात सोमवारी (दि. ३१) जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे पूजन करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी नम्रता जगताप, नगराध्यक्ष मनोज घोंगे, उपनगराध्यक्ष कुमार मोंढे, नंदू गवळी, संतोष डोमे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे, अमित भुसावरे, गणेश शिरसाठ, करण करवंदे, सुरेश पवार, प्रकाश भोये यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, पेठ तालुक्यातील जवळपास सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिका नादुरुस्त स्थितीत असल्याने पेठचे आमदार व पालकमंत्री यांच्याकडे पाठपुरावा सुरू असून, याबाबत पेठसाठी अजून सहा रुग्णवाहिका मिळाव्यात, अशी तालुकावासीयांची मागणी असल्याचे भास्कर गावित यांनी सांगितले.
फोटो- ३१ पेठ ॲम्बुलन्स
पेठ येथे रुग्णवाहिकेच्या लोकार्पणप्रसंगी भास्कर गावित, मनोज घोंगे, नम्रता जगताप, नंदू गवळी, संतोष डोमे, डॉ. योगेश मोरे, आदी.