एकदरे प्रकल्पाबाबत पेठ भाजपचे राज्यपालांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:18 IST2021-08-13T04:18:01+5:302021-08-13T04:18:01+5:30

पेठ : तालुक्यातील एकदरे येथे होऊ घातलेल्या सिंचन प्रकल्पाबाबत स्थानिक जनतेच्या अडचणी व समस्या जाणून घेण्याबाबत प्रत्यक्ष प्रकल्प स्थळी ...

Peth BJP's statement to the governor about the project | एकदरे प्रकल्पाबाबत पेठ भाजपचे राज्यपालांना निवेदन

एकदरे प्रकल्पाबाबत पेठ भाजपचे राज्यपालांना निवेदन

पेठ : तालुक्यातील एकदरे येथे होऊ घातलेल्या सिंचन प्रकल्पाबाबत स्थानिक जनतेच्या अडचणी व समस्या जाणून घेण्याबाबत प्रत्यक्ष प्रकल्प स्थळी भेट देऊन पाहणी करावी अशी पेठ तालुका भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी प्रस्तावित एकदरे प्रकल्पाबाबत स्थानिक जनतेच्या मनात अनेक प्रकारच्या शंका व पुनर्वसनाची भीती असल्याने राज्यपालांनी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी भेट देऊन पाहणी करावी अशी मागणी यावेळी झालेल्या चर्चेत करण्यात आली.

याप्रसंगी दिलीप पाटील, भाजपाचे पेठ उपतालुकाध्यक्ष छगन चारोस्कर, सरचिटणीस रमेश गालट, शहराध्यक्ष त्र्यंबक कामडी, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष संकेत नेवकर आदी उपस्थित होते.

(१२ पेठ बीजेपी)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन देतांना दिलीप पाटील, छगन चारोस्कर, रमेश गालट, त्र्यंबक कामडी, संकेत नेवकर आदी उपस्थित होते.

120821\12nsk_4_12082021_13.jpg

राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना निवेदन देतांना दिलीप पाटील, छगन चारोस्कर, रमेश गालट, त्र्यंबक कामडी, संकेत नेवकर आदी.

Web Title: Peth BJP's statement to the governor about the project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.