सासरच्यांकडून छळ; विवाहितेची तक्रार
By Admin | Updated: December 4, 2015 22:50 IST2015-12-04T22:50:01+5:302015-12-04T22:50:43+5:30
सासरच्यांकडून छळ; विवाहितेची तक्रार

सासरच्यांकडून छळ; विवाहितेची तक्रार
सटाणा : तालुक्यातील द्याने येथील नवविवाहितेचा सासरच्यांकडून शारीरिक व मानसिक छळाबरोबरच सासऱ्याकडून विनयभंग झाल्याची तक्रार जायखेडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे.
बागलाण तालुक्यातील खमताणे हे तिचे माहेर आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात द्याने येथील हिंमत कापडणीस याच्याशी तिचा विवाह झाला. विवाहानंतर काही दिवसातच तुला स्वयंपाक येत नाही, काम येत नाही म्हणून मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला. मात्र हा छळ सहन करत विवाहिता नांदत होती. परंतु २ नोव्हेंबर रोजी सासरे मुरलीधर यांनी आपली बायको व मुलगी घरात नसल्याचा फायदा घेऊन घरात काम करत असलेल्या सुनेचा हात पकडून तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. सुनेने नकार देत कसेबसे घरातून बाहेर येत घडलेला प्रकार आपली सासू मंगलाबाई व नणंद शारदा यांना सांगितला. मात्र घडलेला प्रकार कोणाला सांगू नको नाहीतर तुला मारून टाकू, अशी धमकी त्यांनी दिली. संध्याकाळी पती हिंमत घरी आल्यावर त्याला हा प्रकार सांगितला, तर पतीनेही या प्रकाराबाबत वाच्यता करू नको, असे सांगून मला शिवीगाळ केली. त्यांनतर दिवाळीसाठी माझा भाऊ मला घेण्यास आला असता सासरच्यांनी माहेरी जा; पण कोणाला काही सांगू नको अन्यथा तुला गच्चीवरून फेकून मारून टाकू अशी धमकी दिली. माहेरी आल्यानंतर मी माझ्या माहेरी घडलेला सर्व प्रकार सांगून आता नांदायला जाणार नाही, माझ्या जिवाला आणि इभ्रतीला धोका असल्याचे पीडित विवाहितेने तक्र ारीत नमूद केले आहे. या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात सासरे मुरलीधर कापडणीस, सासू मंगलाबाई कापडणीस, नणंद शारदा संतोष भदाणे, पती हिंमत कापडणीस या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)