लासलगावी मजुराचा छळ

By Admin | Updated: December 12, 2015 22:39 IST2015-12-12T22:39:00+5:302015-12-12T22:39:34+5:30

लासलगावी मजुराचा छळ

Persecution of Lassolge | लासलगावी मजुराचा छळ

लासलगावी मजुराचा छळ


लासलगाव : काम अर्धवट सोडून दिल्याचा रागातून शेतमजुराला कांदा चाळीच्या अ‍ॅँगलला बांधून ठेवल्या-प्रकरणी सचिन लक्ष्मण नागरे यांच्याविरुद्ध लासलगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
सारोळेथडी येथील लक्ष्मण नागरे यांनी चांदवड तालुक्यातील चिंचोले येथील नाना पवार व त्याची पत्नी सरला यांना वार्षिक ४० हजार रुपये व धान्य पोत्याच्या बोलीवर मजुरीवर ठेवले होते. काम करणे अवघड झाल्याने पवार यांनी मजुरीचे १६ हजार रुपये घेऊन कोपरगाव साखर कारखान्यात चालकाची नोकरी सुरू केली. ६ डिसेंबर रोजी येवला येथे गाडीच्या प्रतीक्षेत उभे असताना सचिन नागरे यांनी काम सोडल्याच्या रागातून नाना पवार यास जातिवाचक शिवीगाळ करत वाहनातून सारोळेथडी येथील शेतात चाळीस बांधून ठेवले. पवारने ही माहिती बंधूला सुरेश पवार यास मोबाइलवरून दिली. सुरेशने सदर घटना निफाड पोलिसांना दिली. पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली नाना पवारची सुटका केली. (वार्ताहर)

Web Title: Persecution of Lassolge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.