परप्रांतीय व्होट बँक ठरणार महत्त्वपूर्ण

By Admin | Updated: January 11, 2017 00:43 IST2017-01-11T00:43:10+5:302017-01-11T00:43:25+5:30

माकपाला सेना-भाजपाचे आव्हान

Perpetual vote bank will be crucial | परप्रांतीय व्होट बँक ठरणार महत्त्वपूर्ण

परप्रांतीय व्होट बँक ठरणार महत्त्वपूर्ण

सिडको : गेल्या अनेक वर्षांपासून माकपाने आपली पकड निर्माण केल्याने या भागात माकपाचा अधिक प्रभाव जाणवत असला तरी नुकताच शिवसेनेच्या माध्यमातून प्रभागातील बहुचर्चित अनधिकृत भंगार बाजाराचे अतिक्रमण हटविण्यासाठी पुढाकार घेतल्याने या प्रभागात सेनेची ताकद वाढली आहे. याबरोबरच भाजपानेही याठिकाणी आपली ताकद पणाला लावली असल्याने या ठिकाणी सध्यातरी तिरंगी लढत होण्याची शक्यता दिसत आहे, तर मनसे व कॉँग्रेस - राष्ट्रवादीला उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे.
प्रभाग २६ मध्ये माकपाला शह देण्यासाठी शिवसेनेबरोबरच भाजपासह अन्य पक्ष हे ताकदवार उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या प्रभागात परप्रांतीयांची संख्या अधिक असल्याने त्यांच्या एकगठ्ठा मतांवरही उमेदवारांचे भवितव्य काही प्रमाणात अवलंबून आहे. या प्रभागातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अनधिकृत भंगार बाजाराचा प्रश्न शिवसेनेच्या माध्यमातून मार्गी लागल्याने सेनेच्या उमेदवाराला परप्रांतीय मतदान करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असला तरी परप्रांतीयांच्या मतांऐवजी इतर मतदानही मोठ्या प्रमाणात असल्याने भंगार बाजार हटविल्याचा फायदा सेनेला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  या प्रभागातून माकपाकडून विद्यमान नगरसेवक अ‍ॅड. तानाजी जायभावे, सचिन भोर, माजी नगरसेवक अ‍ॅड. वसुधा कराड आदि, तर सेनेकडून माजी नगरसेवक दिलीप दातीर, समन्वयक भागवत आरोटे, विभागप्रमुख गोरख घाटोळ यांच्या पत्नी वैशाली घाटोळ, भारतीय विद्यार्थी सेनेचे महानगरप्रमुख संदीप गायकर यांच्या पत्नी हर्षदा गायकर, माजी विभागप्रमुख सुधाकर जाधव यांच्या पत्नी रंजना जाधव, उपविभागप्रमुख अरुण कुशारे यांच्या पत्नी भारती कुशारे, पुष्पावती पवार, शोभा बोराडे, शालिनी मटाले, कविता देवरे, राजश्री लोहार आदि इच्छुक आहेत, तर भाजपाकडून माजी सिडको प्रभाग सभापती अलका अहिरे, डॉ.ज्योती सोनवणे, मंडल उपाध्यक्ष निवृत्ती इंगोले, शहर उपाध्यक्ष कैलास अहिरे, अशोक पवार, उखा चौधरी, मधुकर जाधव, तर राष्ट्रवादीकडून विठ्ठल विभुते इच्छुक आहेत.

Web Title: Perpetual vote bank will be crucial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.