परप्रांतीय दुचाकी चोरट्यास अटक

By Admin | Updated: October 20, 2016 02:06 IST2016-10-20T01:56:32+5:302016-10-20T02:06:02+5:30

परप्रांतीय दुचाकी चोरट्यास अटक

Perpetual twin thieves arrested | परप्रांतीय दुचाकी चोरट्यास अटक

परप्रांतीय दुचाकी चोरट्यास अटक

नाशिक : त्र्यंबक नाक्यावरील पिनॅकल मॉल परिसरातील दुचाकी चोरणारा संशयित आकाश ईश्वरीप्रसाद नामदेवे (रा. मोहननगर, छत्तीसगड) या परप्रांतीय चोरट्यास नागरिकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना सोमवारी (दि़ १७) दुपारच्या सुमारास सहनिबंधक कार्यालयाच्या पार्किंगमध्ये घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरण प्रभाकर बैरागी (रा़ म्हसरूळ टेक, दिंडे वाडा, जुने नाशिक) हे दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्र्यंबकनाक्यावरील सहनिबंधक कार्यालयात गेले होते. त्यांनी आपली दुचाकी (एमएच १५ बीपी ९१३१) पार्किंगमध्ये लावून गेले़
संशयित नामदेवे याने ही दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केला; मात्र तो नागरिकांच्या लक्षात आला व त्यांनी त्याला रस्त्यातच अडविले़
यानंतर बैरागी कार्यालयातून खाली आले असता त्यांना आपली दुचाकी संशयिताकडे आढळून आली़ यानंतर बैरागी व तेथील नागरिकांनी संशयित नामदेवे यास पोलिसांच्या ताब्यात दिले़ याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Perpetual twin thieves arrested