जुन्या पद्धतीने अर्ज स्वीकृतीला परवानगी
By Admin | Updated: October 6, 2015 22:37 IST2015-10-06T22:34:30+5:302015-10-06T22:37:26+5:30
जुन्या पद्धतीने अर्ज स्वीकृतीला परवानगी

जुन्या पद्धतीने अर्ज स्वीकृतीला परवानगी
निफाड : नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना आॅनलाइन उमेदवारी अर्ज भरताना तांत्रिक कारणांमुळे इंटरनेट सेवा खंडित, संकेतस्थळ सर्व्हर डाउन झाल्याने सलग सहाव्या दिवशीही प्रचंड अडचणी आल्याने निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज जुन्या पद्धतीने स्वीकारण्याची परवानगी दिली असल्याची माहिती निफाड नगरपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. संदीप अहेर यांनी दिली.
गेले सहा दिवस उमेदवारी अर्ज आॅनलाइन भरताना उमेदवारांना असंख्य अडचणी आल्याने व उमेदवारी अर्ज भरल्यानंतर निघालेल्या फायनल प्रिंटमध्ये दोष असल्याने या सर्व तक्रारींचे निवेदन निवडणूक आयोगाला जिल्हाभरातून पाठविण्यात आले होते. या तक्रारीची निवडणूकआयोगाने दखल घेत उमेदवारी अर्ज स्वीकृतीच्या उरलेल्या दोन दिवसात दि. ७ आणि ८ आॅक्टोबरदरम्यान जुन्या पद्धतीने उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली आहे. शिवाय अर्ज दाखल करण्याची वेळही वाढवून देण्यात आली आहे. (वार्ताहर)