आखाड्यांमध्ये कायमस्वरूपी मुलभूत सुविधा द्याव्यात
By Admin | Updated: August 2, 2014 01:25 IST2014-08-01T23:30:06+5:302014-08-02T01:25:10+5:30
प्रशासनाच्या बैठकीत एकमुखी मागणी

आखाड्यांमध्ये कायमस्वरूपी मुलभूत सुविधा द्याव्यात
वसंत तिवडे ल्ल त्र्यंबकेश्वर
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक अखाड्यांकरिता कायमस्वरुपी सुविधा द्याव्यात जेणेकरून वारंवार सुविधा देण्याची गरज भासणार नाही. या व अशा विविध मागण्या बैठकीस उपस्थित प्रत्येक साधू-महात्मा आदिंनी आज केल्या. त्र्यंबकेश्वर येथे आज प्रशासनातर्फे साधू-संत महंत आदिंच्या उपस्थितीत पार पडला.
त्र्यंबक नगरपालिकेच्या झालेल्या या बैठकीतील चर्चेत महंत हरिगीरी महाराज म्हणाले, त्र्यंबक कुंभमेळा आंतरराष्ट्रीय दर्जाचा ठरणार आहे. भाविक मंडळी गत मेळ्यापेक्षा तीनपट जास्त येतील. सिंहस्थाच्या नावावर सुविधा मिळतात. मात्र स्थानिक प्रशासनाने केवळ कुंभमेळ्यापुरते लक्ष न देता आपल्या वॉर्डांबरोबर अखाड्यांच्या नागरी सुविधांकडे लक्ष द्यावे. आमच्या खासगी जागेत आम्ही महामंडलेश्वरांची व्यवस्था करू शकतो. पण रस्ते, पाणी, वीज, शेड आदि बांधून द्यावे आदि मागण्या केल्या.
स्वामी सागरानंद सरस्वती-त्र्यंबकेश्वर अखाडा परिषद अध्यक्ष म्हणाले, कायमस्वरुपी नियंत्रण कक्ष स्थापन करून अनुभवी अधिकारी नेमावा. जव्हार रस्त्याला जोडणारा कासारबारी रस्त्याचे कॉँक्रिटीकरण करावे. नाशिकला ८० लक्ष भाविक येतील तर मग त्र्यंबकला किमान ३० लक्ष भाविकांचा अंदाज आहे. रिंगरोड रूंद करावा.
महंत नरेंदगिरी (महासचिव निरंजनी अखाडा) म्हणाले- कुंभमेळा परंपरांचे पालन करावे, नवीन परंपरा निर्माण करू नये असे सांगितले. ठेकेदारांची बिले (अखाड्यांकरिता केलेल्या सुविधा) अखाड्यांनी समाधानकारक काम झाले असे सांगितल्याशिवाय अदा करू नयेत. गॅस आणि शिधापत्रिका उपलब्ध करून सवलतीच्या दराने रेशन द्याव असे सांगितले. यावेळी निलपर्वत जुना अखाडा महंत प्रेमगिरी, महंत शंकरानंद सरस्वती (आनंद अखाडा), अटल अखाडा महंत उदयगिरी, नया उदासिन अखाडा, महंत विचारदास आदिंनी आपापले मनोगत व्यक्त केले.
प्रशासनाच्या या बैठकीसाठी नरेंदगिरी, रवींद्रपुरीजी, हरिगिरी, महंत प्रेमगिरी, सागरानंद सरस्वती, महंत शंकरानंद, समुद्रगिरी, गोविंदानंद ब्रह्मगिरी, उदयगिरी, रघुमुनीजी, दुर्गादासजी, आगरदासजी, केवलदासजी, विचारदासजी, राजेंद्रसिंहजी, हरिनारायण पुरीजी, रमेशगिरीजी, धरमानंद, दुर्गानंद ब्रह्मचारी आदि साधू-महंत उपस्थित होते. (वार्ताहर)