सहा जेसीबी खरेदीला स्थायीची मंजुरी
By Admin | Updated: February 28, 2017 00:57 IST2017-02-28T00:57:34+5:302017-02-28T00:57:47+5:30
मालेगाव : शहरातील व कचरा डेपोवरील घाणीची विल्हेवाट लावण्यासाठी सहा जेसीबी खरेदीच्या निविदेसह सार्वजनिक शौचालय उभारणी, मजूर ठेक्याच्या निविदेला स्थायी समितीने सोमवारी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली.

सहा जेसीबी खरेदीला स्थायीची मंजुरी
मालेगाव : शहरातील व कचरा डेपोवरील घाणीची विल्हेवाट लावण्यासाठी सहा जेसीबी खरेदीच्या निविदेसह सार्वजनिक शौचालय उभारणी, मजूर ठेक्याच्या निविदेला स्थायी समितीने सोमवारी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली.
मालेगाव महापालिकेच्या नवीन इमारतीतील स्थायी समिती कार्यालयात सभापती एजाज बेग यांच्या अध्यक्षतेखाली व मनपा उपायुक्त अंबादास गरकळ, कमरुद्दीन शेख यांच्या उपस्थितीत झालेल्या स्थायी समिती सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत नामांकित कंपनीचे दोन जेसीबी खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. स्थायी समिती सदस्यांनी प्रत्येक प्रभागासाठी एक व कचरा डेपोसाठी दोन असे सहा जेसीबी खरेदी करण्याच्या विषयाला मंजुरी दिली. तसेच प्रभाग क्रमांक १ मध्ये ठिकठिकाणी दहा सीटचे सार्वजनिक शौचालय, प्रभाग क्रमांक २ मध्ये दहा सीटचे १३ युनिट, प्रभाग क्रमांक ३ मध्ये दहा सीटचे ८ युनिट, प्रभाग क्रमांक ४ मध्ये दहा सीटचे १३ युनिटच्या निविदांना मंजुरी देण्यात आली तर इस्लामपुरा भागातील जमिनी संदर्भातील न्यायालय दाव्याबाबत तडजोड करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिग्विजय एंटरप्राईजेसच्या मजुर ठेक्याला मुदतवाढ देण्यात आली. म्हाळदे शिवारातील गांडुळ खत प्रकल्पावरील खत विक्रीचा प्रचलीत दर कमी करण्यासह इतर विषयांना स्थायी समितीने मंजुरी दिली.
बैठकीस स्थायी समिती सदस्य सुनिल गायकवाड, ताहेरा शेख, मिनाताई काकळीज, रविंद्र पवार, विठ्ठल बर्वे, गुलाब पगारे आदिंसह उपायुक्त अंबादास गरकळ, कमरुद्दीन शेख, विलास गोसावी, प्रभाग अधिकारी पंकज सोनवणे, अनिल पारखे, शहर अभियंता कैलास बच्छाव आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)