पदग्रहण सोहळ्यात रंगणार शक्तिप्रदर्शन

By Admin | Updated: March 8, 2015 01:29 IST2015-03-08T01:28:57+5:302015-03-08T01:29:24+5:30

पदग्रहण सोहळ्यात रंगणार शक्तिप्रदर्शन

Performance show will take place in the ceremony | पदग्रहण सोहळ्यात रंगणार शक्तिप्रदर्शन

पदग्रहण सोहळ्यात रंगणार शक्तिप्रदर्शन

  नाशिक : येत्या सोमवारी (दि.९) महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे नव्यानेच प्रदेशाध्यक्ष झालेले माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण पदभार स्वीकारणार असून, नाशिक शहर व जिल्'ातून या पदग्रहण सोहळ्यासाठी इच्छुकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरू आहे. प्रदेश पातळीवर बदल झाल्यानंतर आता नाशिक शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बदलाबाबतही जोरदार वारे वाहू लागले असून, शहराध्यक्ष पदाचा प्रभारी पदभार पाहणारे शरद अहेर यांच्यासह शहराध्यक्ष पदासाठी शैलेश कुटे, अ‍ॅड.आकाश छाजेड, उद्धव निमसे, माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव आदिंसह शहराध्यक्ष पद मिळविण्यासाठी जोरदार लॉबिंग करण्याच्या तयारीत आहेत. त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष पदासाठीही अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपतराव सकाळे, सुनील आव्हाड, माजी आमदार अनिल अहेर, माजी सभापती यशवंत पाटील यांच्यासह अनेक जण इच्छुक आहेत. मावळते जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी आपल्याला आता जिल्हाध्यक्ष पदात रस नसल्याने सांगितले असले तरी त्यांची प्रदेश पातळीवर वर्णी लावण्यासाठी तयारी सुरू असल्याचे समजते. येत्या सोमवारी (दि.९) मुंबईला टिळक भवनात प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे खासदार अशोक चव्हाण स्वीकारणार असून, या पदग्रहण सोहळ्यास शेकडो समर्थकांसह उपस्थित राहून शक्तिप्रदर्शन करण्याची काही इच्छुकांनी तयारी केली असून, एका इच्छुकाने तर थेट १०० खासगी वाहनांमधून समर्थक मुंबईला नेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या पदग्रहण सोहळ्याला शहर व जिल्हा पदािधकारी पदी वर्णी लावण्यासाठी इच्छुक असलेल्यांकडून सोमवारी मुंबईला जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Performance show will take place in the ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.