लोक अदालतमध्ये ५१ प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 12:55 AM2020-02-09T00:55:33+5:302020-02-09T00:58:39+5:30

इगतपुरी : इगतपुरी तालुका विधी सेवा प्राधिकरण व इगतपुरी वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने इगतपुरी न्यायालयात राष्ट्रीय महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५४३ प्रलंबीत पैकी ५१ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

In the people's court, there were six cases | लोक अदालतमध्ये ५१ प्रकरणे निकाली

लोकन्यायालयात मार्गदर्शन करतांना मुख्य दिवाणी न्यायाधीश श्रीमती आर. एन. खान व्यासपिठावर सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एल. के. सपकाळ, वकील संघाचे उपाध्यक्ष अँड. जितेंद्र शिंदे आदि.

Next
ठळक मुद्देइगतपुरी : १६,८४,१४० रुपये सरकारच्या तिजोरीत जमा

इगतपुरी : इगतपुरी तालुका विधी सेवा प्राधिकरण व इगतपुरी वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने इगतपुरी न्यायालयात राष्ट्रीय महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५४३ प्रलंबीत पैकी ५१ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
यावेळी व्यासपिठावर मुख्य दिवाणी न्यायाधीश श्रीमती आर. एन. खान, सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एल. के. सपकाळ, वकील संघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. जितेंद्र शिंदे, सचिव वाय. व्ही. कडु, सहसचिव श्रीमती विजयामाला वाजे, जेष्ठ समाजसेवक शंकरराव डांगळे आदि उपस्थित होते.
या लोकन्यायालयामध्ये इगतपुरी न्यायालयातील ५४३ प्रलंबीत पैकी ५१ प्रकरणामधुन सोळा लाख चौऱ्यांशी हजार त्रेचाळीस रु पये वसुल झाले. तर २५६९ दाखलपुर्व प्रकरणा पैकी ४१८ प्रकरणे निकाली काढण्यात आली असुन यातुन बारा लाख पंधरा हजार चारशे अडसष्ट एवढी रक्कम वसुल करण्यात आली.
न्यायालयात वर्षानुवर्ष चालल्या प्रकरणामध्ये एक पक्षकार आनंदी होतो तर एक नाराज होतो. मात्र लोक अदालतमध्ये दोन्ही पक्षकारांना न्याय मिळुन दोघेही आनंदी होतात. म्हणुन उच्च न्यायालयाच्या आदेशाने लोक अदालतचे आयोजन केले जाते. त्यात जास्तीत जास्त पक्षकारांनी सहभाग घेतला तर प्रकरण लवकर मार्गी लागुन पक्षकारांचा वेळ व पैसा वाचवला जाऊ शकतो असे प्रतिपादन खान यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करताना केले.
सदरचे लोकन्यायालय यशस्वी करणेकामी इगतपुरी न्यायालयातील तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी मनोज मंडाले, सहायक अधिक्षक श्रीमती के. डी. सोनवणे यांच्यासह ज्येष्ठ व कनिष्ठ वकील यांनी परिश्रम घेतले.
या प्रसंगी ज्येष्ठ वकील आर. जी. वाजे, ईश्वरसिंग परदेशी, इरफान पठाण, युवराज जाधव, एस. बी. पवार, डी. बी. खातळे, एन. पी. चव्हाण, ओमप्रकाश भरंडिवाल, नदीम शेख, विजय कर्णावट, एन. के. वालझाडे, पी. टी. सदगीर, शिबाना मेमन, प्रगती सुरते, त्रिशला टाटीया, विनिता वाजे, संपदा उबाळे, संध्या भडांगे, पौर्णिमा यादव, स्मिता रोकडे, धरती वाजे, मनिषा वारूंगसे आदी वकील उपस्थित होते.

 

Web Title: In the people's court, there were six cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.