अपत्य असणारे लोक अधिक जगतात
By Admin | Updated: March 16, 2017 00:45 IST2017-03-16T00:43:28+5:302017-03-16T00:45:36+5:30
मुले असल्यास तुमचे आयुष्य दोन वर्षांनी वाढते, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. मुले आणि मुली पालकांची मने

अपत्य असणारे लोक अधिक जगतात
नाशिक : महापालिकेत बहुमताने सत्तारूढ झालेल्या भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना आता सत्तापदांचे वेध लागले आहेत. महापालिकेची अर्थवाहिनी मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीचे सभापतिपद पटकावण्यासाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर अन्य पक्षांतून भाजपात उड्या घेणाऱ्या नगरसेवकांमध्येच स्पर्धा सुरू झाली असून, जुन्या-नव्यांचा वाद उफाळून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या रंजना भानसी आणि उपमहापौरपदी भाजपाचेच प्रथमेश गिते यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर आता महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या निवडणुकीचे वेध इच्छुकांना लागले आहेत. स्थायी समितीवर महापौरांकडून १६ सदस्य तौलनिक संख्याबळानुसार नियुक्त केले जातील. त्यासाठी येत्या आठ ते दहा दिवसांत महापौरांकडून विशेष सभा बोलाविली जाण्याची शक्यता आहे. तौलनिक संख्याबळ पाहता भाजपाचे सर्वाधिक ९ तर शिवसेनेचे ४, कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचा प्रत्येकी एक सदस्य स्थायीवर नियुक्त होण्याची शक्यता आहे.
स्थायी समितीवर भाजपाचेच संख्याबळ अधिक राहणार असल्याने भाजपाचाच सभापती विराजमान होणार आहे. महापौरपद पंचवटी विभागाला तर उपमहापौरपद पूर्व विभागाला गेल्यानंतर आता स्थायी समितीचे सभापतिपद कोणत्या विभागाच्या पारड्यात पडते, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. स्थायीवर भाजपाचे नऊ सदस्य नियुक्त होणार असून, पहिल्या वर्षी जुन्या-नव्यांचा मेळ घालताना पक्षपदाधिकाऱ्यांची कसोटी लागणार आहे. महापौर-उपमहापौरपदाचा कालावधी हा भाजपाने पक्षीय स्तरावर सव्वा वर्षांचा ठेवल्याने दूरदृष्टिकोन ठेवत पक्षातील काही ज्येष्ठ व निष्ठावंत सदस्यांनी स्थायी समितीवर सदस्य म्हणून पहिली दोन वर्षे जाण्यास नकार दिल्याचे समजते.