पेन्शन हक्क संघटनेचे जिल्ह्यात धरणे आंदोलन

By Admin | Updated: February 17, 2016 00:22 IST2016-02-16T23:18:25+5:302016-02-17T00:22:02+5:30

पेन्शन हक्क संघटनेचे जिल्ह्यात धरणे आंदोलन

Pensions Movement District's District Movement | पेन्शन हक्क संघटनेचे जिल्ह्यात धरणे आंदोलन

पेन्शन हक्क संघटनेचे जिल्ह्यात धरणे आंदोलन

पेठ : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यात तहसील कार्यालयापुढे शनिवारी (दि.२०) धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सचिन वडजे व सरचिटणीस बाजीराव कमानकर यांनी दिली.
१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजना मान्य नसून, १९८२ साली कायदा करून विहित केलेली जुनी पेन्शन सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यभर सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांचे संघटन तयार झाले आहे. या आंदोलनात १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत लागलेले प्राथमिक- माध्यमिक शिक्षक, आरोग्यसेवक, पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी, ग्रामसेवक, महसूल विभागाचे कर्मचारी, जलसंपदा विभागाचे कर्मचारी तसेच इतर विभागाचे कर्मचारी सहभागी होणार आहेत. आंदोलन यशस्वीतेसाठी राज्य संपर्कप्रमुख एल. एल. भंडारे, कार्याध्यक्ष नीलेश नहिरे, कोषाध्यक्ष सौरभ अहिरराव, प्रसिद्धीप्रमुख संदीप शिरसाठ, संपर्कप्रमुख जावेद कारभारी, जिल्हा उपाध्यक्ष राहुल गांगुर्डे, संतोष शेळके, कल्पेश चव्हाण, अनिल भरीतकर, विलास खैरनार, जिल्हा प्रतिनिधी किरण शिंदे, वैभव गगे, जनार्दन केकरे, परिश्रम घेत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Pensions Movement District's District Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.