दंडही हवाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:56 AM2017-09-24T00:56:46+5:302017-09-24T00:56:46+5:30

पाणी पावसापासून उद्भवणाºया साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने जे स्वच्छता अभियान सुरू केले आहे त्यास नाशकातही उदंड प्रतिसाद मिळाला ही बाब चांगलीच म्हणायची; पण अशा एकदिवसीय उत्सवी आयोजनाने यामागील मूळ हेतू साध्य होईल का, हा प्रश्नच ठरावा.

Penalty too! | दंडही हवाच !

दंडही हवाच !

Next

साराश
किरण अग्रवाल
पाणी पावसापासून उद्भवणाºया साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने जे स्वच्छता अभियान सुरू केले आहे त्यास नाशकातही उदंड प्रतिसाद मिळाला ही बाब चांगलीच म्हणायची; पण अशा एकदिवसीय उत्सवी आयोजनाने यामागील मूळ हेतू साध्य होईल का, हा प्रश्नच ठरावा. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीच अशी स्वच्छता मोहीम राबविली जाते. नित्य-नैमित्तिक पातळीवर जी सफाई राहून जाते ते ‘ब्लॅक स्पॉट’ हेरून ते यानिमित्ताने स्वच्छ केले जातात. त्यामुळे अशा मोहिमा उपयोगी निश्चितच ठरतात. पण त्या राबविल्या जाताना त्याकडेही केवळ शासकीय उपचार म्हणून पाहणाºयांची संख्या मोठी असल्याने पालकमंत्री गिरीश महाजन म्हणतात त्याप्रमाणे, जनजागृतीसह दंडात्मक कारवाईची तरतूद केली जाणेही आवश्यकच ठरावे. विशेष म्हणजे नाशकात स्वच्छता पंधरवड्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल ३५० टन कचरा संकलित केला गेला. यासाठी २८ हजारांवर नागरिकांचा सहभाग लाभला, ज्यात शाळकरी विद्यार्थ्यांचे प्रमाणही लक्षणीय होते. पण या गर्दीत विद्यार्थी व सामान्य नागरिक ज्या प्रामाणिकपणे सफाई करताना दिसून आले, तसे शासकीय कर्मचारी व राजकीय कार्यकर्त्यांच्या बाबतीत अपवादानेच दिसू शकले. स्वत: पालकमंत्री महाजन सक्रियपणे स्वच्छता करत असताना अनेकांनी त्यांच्या पाठीमागे उभे राहात ‘सेल्फी’ काढून चमकोगिरी करण्याचाच प्रयत्न केल्याचे दिसून आले. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची अशी मानसिकता असताना विरोधी पक्षीयांनीही यासाठी फारसा उत्साह किंवा सहभाग दाखविलेला दिसून येऊ शकला नाही. उलट अशी मोहीम एक दिवस राबवून फोटोसेशन करून घेण्याऐवजी रोज स्वच्छतेची काळजी घेतल्यास अशा मोहिमा राबविण्याची वेळ येणार नाही, अशी टीका केली. अर्थात, आपल्याकडील एकूणच मानसिकता लक्षात घेता, विशेषत्वाने काही मोहिमा हाती घेतल्याखेरीज उद्देशित कामे पार पडत नाहीत. त्यामुळे जे केले गेले ते चांगलेच झाले, फक्त त्याबद्दलची जाणीव रुजविली जाणे गरजेचे आहे. पालकमंत्री महाजन म्हणतात त्याप्रमाणे स्वच्छता हा खरेच सवयीचा भाग आहे. त्यामुळे ही आपल्या स्वत:पासून सुरू करून अंगवळणी पडणे गरजेचे आहे. शिवाय, अस्वच्छता करणाºयांवर दंडात्मक कारवाई केली गेल्याखेरीज ही सवय लागणार नाही. शहरातील कचºयाची ठिकाणे निश्चित करून तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, त्याद्वारे अस्वच्छता करणारे शोधण्याचा विचारही महाजन यांनी बोलून दाखविला आहे. तेव्हा, तसे झाले तर खरेच त्याचा परिणाम दिसून येऊ शकेल. विनामूल्य मिळणाºया वस्तूबाबत जसे कुणाला गांभीर्य नसते, तसे कारवाईची अगर दंडाची भीती असल्याशिवाय नागरिकांना शिस्त लागत नाही, हे खरे असल्याने पालकमंत्र्यांनी त्याबाबत निर्णय घेतल्यास सुज्ञ नाशिककर त्याचे स्वागतच करतील.

 

 

Web Title: Penalty too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.