मालेगावी एलबीटी न भरणाऱ्यांना दंड
By Admin | Updated: July 23, 2014 00:32 IST2014-07-22T22:07:56+5:302014-07-23T00:32:21+5:30
मालेगावी एलबीटी न भरणाऱ्यांना दंड

मालेगावी एलबीटी न भरणाऱ्यांना दंड
मालेगाव : येथील महानगरपालिका हद्दीतील स्थानिक कर किंवा एलबीटीचा वार्षिक परतावा भरण्यास दिरंगाई करणाऱ्या सुमारे एक हजार ५०० व्यावसायिकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
महापालिका क्षेत्रात २२ मे २०१३ रोजी जकात बंद करून स्थानिक सेवा कर लावण्यात आल्याने मनपातर्फे वसुलीला सुरुवात करण्यात आली आहे. हद्दीत सुमारे चार हजार ४०० व्यावसायिक स्थानिक सेवा करास पात्र असून, त्यांनी आपला वार्षिक परतावा जून २०१४ अखेर भरणे आवश्यक होते; मात्र मनपाने साप्ताहिक व प्रासंगिक सुट्टीमुळे परतावा भरण्यासाठी १ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती. या मुदतीत तीन हजार व्यावसायिकांनी परतावा भरला असून, सुमारे १५०० व्यावसायिकांनी परतावा भरलेला नाही. अशा व्यावसायिकांना प्रत्येकी पाच हजार रुपये मनपातर्फे दंड आकारण्यात आला असून, त्यांना दंडासाठी नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. दंडाची रक्कम संबंधिताच्या करात समाविष्ट करण्यात आली असून, त्याची सक्तीने वसुली करण्यात येणार असल्याचे मनपातर्फे सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
’ नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यांची कामे केली जात आहेत. परंतु पावसामुळे सदर कामे रेंगाळली आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांवर चिखल झाला आहे.