शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त नागरिकांवर मनपाकडून दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:53 IST

झाडांचा पालापाचोळा जाळणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे तसेच प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही वापर करणे, गोदावरी नदीत वाहने धुऊन नदीपात्र दूषित करणे, उघड्यावर लघुशंका करणे, दुर्गंधी पसरविणे अशा बेशिस्त नागरिकांवर पंचवटी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

पंचवटी : झाडांचा पालापाचोळा जाळणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे तसेच प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही वापर करणे, गोदावरी नदीत वाहने धुऊन नदीपात्र दूषित करणे, उघड्यावर लघुशंका करणे, दुर्गंधी पसरविणे अशा बेशिस्त नागरिकांवर पंचवटी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.१ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ अशा वर्षभराच्या कालावधीत सुमारे ४९५ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून सुमारे १० लाख ३७ हजार रु पयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती महापालिका पंचवटी आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.कचरा वर्गीकरण न करणाऱ्या १०४ नागरिकांवर कारवाई करण्यात येऊन ५२ हजार रु पयांचा दंड आकारण्यात आला तर २५ व्यावसायिकांवर कारवाई करत त्यांच्याकडून सुमारे दोन लाख ४५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. रबर, प्लॅस्टिक तसेच पालापाचोळा व इतर वस्तू जाळणाºया डझनभर नागरिकांवर कारवाई करून ६० हजार रु पये दंड वसूल केला आहे. तर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाºया १७९ बेशिस्त नागरिकांवर दंडाची कारवाई करण्यात आली आहे. सुमारे एक लाख ७० हजार रु पयांचा दंड सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना ठोठावला आहे.नदीपात्रात वाहने धुण्यात येत असली तरी गोदावरी नदीत प्रदूषण करून नियमांची पायमल्ली केली म्हणून ६९ वाहनधारकांवर कारवाई करून त्यांच्याकडून १७ हजार ४८० रु पये दंड वसूल केला आहे. उघड्यावर लघुशंका करणाºया तीन तर शौच करणाºया ११ अशा १४ बेशिस्त नागरिकांकडून सहा हजार रु पयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पंचवटी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने केलेल्या वर्षभराच्या कारवाईत पंचवटी महापालिका लखोपती झाली आहे. उपायुक्त सचिन हिरे, विभागीय अधिकारी राजेंद्र गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, डी. बी. माळेकर, किरण मारू, उदय वसावे, सिद्धार्थ रामवंशी, रशीद शेख, संजय तिडके, विनय रेवर आदींनी कामगिरी केली आहे.प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापरप्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरामुळे निसर्गाला हानी पोहोचत असल्याने ५० मायक्र ॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या वापरावर बंदी घातलेली असली तरी शासनाच्या नियमाची पायमल्ली करून उघडपणे प्लॅस्टिक पिशव्या विक्र ी करणाºया व वापरणाºया ८५ व्यापाºयांविरु द्ध कारवाई करून सुमारे चार लाख ४५ हजार रु पयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर जैविक कचरा घंटागाडीत टाकल्याप्रकरणी चाळीस हजार रु पयांचा दंड आकारून पाच नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाenvironmentवातावरण