पादचारी महिलेची सोनसाखळी खेचली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:40 IST2017-10-16T00:38:32+5:302017-10-16T00:40:06+5:30
नाशिक : पतीसमवेत घरी पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी खेचून नेल्याची घटना शनिवारी (दि़३०) सायंकाळच्या सुमारास घडली़

पादचारी महिलेची सोनसाखळी खेचली
नाशिक : पतीसमवेत घरी पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी खेचून नेल्याची घटना शनिवारी (दि़३०) सायंकाळच्या सुमारास घडली़
वत्सला कृष्णन (४९, रा़ गणेश बाबानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्या पती शरद कृष्णन यांच्यासमवेत उद्यानातून घरी पायी जात होत्या़ त्यावेळी कल्पतरू गार्डनसमोर काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोन संशयितांपैकी पाठीमागे बसलेल्याने त्यांच्या गळ्यातील २८ ग्रॅम वजनाची ५६ हजार रुपये किमतीची सोनसाखळी खेचून नेली़