अज्ञात वाहनाच्या धडकेने पादचारी ठार
By Admin | Updated: May 16, 2017 17:26 IST2017-05-16T17:26:29+5:302017-05-16T17:26:29+5:30
मुंबई आग्रा महामार्गावरील क का वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील रस्त्याने रस्ता ओलांडणाऱ्या अनोळखी इसम ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेने पादचारी ठार
लोकमत न्यूज नेटकर्व
पंचवटी : मुंबई आग्रा महामार्गावरील क का वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील रस्त्याने रस्ता ओलांडणाऱ्या अनोळखी इसमाला भरघाव वेगाने जाणाऱ्या चारचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात अंदाजे ३० वर्षीय इसम ठार झाल्याची माहीती पंचवटी पोलीसांनी दिली आहे. याबाबत पंचवटी पोलीसात अज्ञात वाहनाच्या चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.