अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

By Admin | Updated: July 29, 2014 00:51 IST2014-07-28T23:54:51+5:302014-07-29T00:51:53+5:30

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

Pedestrian killed in an unidentified vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

ओझर टाऊनशिप : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील एचएएल गेट क्रमांक तीनजवळ असलेल्या म्हसोबा मंदिरासमोर अज्ञात वाहनाने अनोळखी पादचाऱ्यास धडक दिल्याने पादचारी ठार झाला.
पिंपळगावकडे जाणाऱ्या मार्गावर एचएएल गेट क्रमांक तीनजवळील म्हसोबा मंदिरासमोर अनोळखी पादचाऱ्यास अज्ञान वाहनाने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. अद्यापपर्यंत त्याची ओळख पटलेली नाही. मृताचे वय अंदाजे ३० वर्षे,
रंगाने सावळा, उंची ५ फूट २ इंच, शरीराने सडपातळ, चेहरा लांबट, डोक्याचे केस वाढलेले, जाड
मिशी, नाक सरळ, अंगात पांढरा शर्ट, चॉकलेटी काळसर रंगाची पँट
आहे.
सदर वर्णनाच्या इसमाबाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी ओझर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)

Web Title: Pedestrian killed in an unidentified vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.