शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

मोराच्या वंशाची कुक्कुटपालनाच्या खुराड्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 10:32 PM

नांदगाव : तालुक्यात जंगलात मोराने घातलेली अंडी चोरून कोंबडीच्या खुराड्यात कोंबड्यांकडून ती उबवून घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे वन्यप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देमोरांची अंडी खाणाऱ्यांबरोबर मोरांचे मांस खाणारे यापूर्वी पकडले गेल्याचे सर्वश्रुत आहे.

नांदगाव : तालुक्यात जंगलात मोराने घातलेली अंडी चोरून कोंबडीच्या खुराड्यात कोंबड्यांकडून ती उबवून घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे वन्यप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

थव्यांनी फिरणाऱ्या मोरांचा वंश कुक्कुटपालनकर्त्यांच्या खुराड्यात वाढू लागल्याच्या घटनांनी भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर यापुढे पाळीव प्राणी म्हणून खुराड्यात जन्माला येणार का, असा प्रश्न वन्यजीवप्रेमींना पडला असून, वनविभागाने याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

ह्यजंगल में मोर नाचा किसने देखाह्ण असे म्हणण्याऐवजी कोंबडीच्या खुराड्यातला स्वातंत्र्य हिरावलेला उदास मोर बघण्याची वेळ आली आहे. कारण जंगलात मोराने घातलेली अंडी चोरून कोंबडीच्या खुराड्यात कोंबडीकडून ती उबवून घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यात ठिकठिकाणी आढळणाऱ्या मोरांच्या कळपांची संख्या लक्षणीय आहे. शेतकऱ्यांच्या घराजवळ त्यांचे अस्तित्व दिसून येते. त्यांच्यासाठी शेतकरी दाणापाण्याची व्यवस्था करतात. मात्र अलीकडे काही कुक्कुट व्यावसायिकांनी मोराची अंडी पळवून कोंबडीकडून ती उबवून घेतली आणि कोंबड्यांबरोबरच त्यांनाही खुराड्यात डांबले. अशाच एका खुराड्यात एक मोर डावा पाय गंभीर जखमी झाल्याने कोंबडीच्या खुराड्यात आकांत करताना आढळून आला. त्याच्या जोडीचा दुसरा मोर कुत्र्याने फस्त केल्याची माहिती मिळाली. मल्हारवाडी ग्रामपंचायत हद्दीत बेलदारवाडी येथील डोंगर माथ्यावर हा प्रकार घडला.तालुक्यात शेकडोंच्या संख्येने मोर आहेत. मोरांची अंडी खाणाऱ्यांबरोबर मोरांचे मांस खाणारे यापूर्वी पकडले गेल्याचे सर्वश्रुत आहे. या पार्श्वभूमीवर कोंबडीच्या पंखाखाली मोराचे अंडे उबवून त्याला खुराड्यात बंदिस्त करणारी मानसिकता सरळ करण्याची गरज आहे. वनविभागाने तातडीने याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्राणीप्रेमी करत आहेत. साकोरा येथे वर्षभरापूर्वी अशीच घटना घडली होती. तेथील कुक्कुटपालक कोंबड्यासोबत मोर पाळत होता हे कळाल्यानंतर त्याला भगवान हिरे या शिक्षकाने वन्यजीव संरक्षण कायद्याची माहिती देऊन मोराची सुटका केली होती. बेलदारवाडीच्या डोंगरावर, कोंबडीच्या खुराड्यात जन्माला आलेला मोर केविलवाण्या अवस्थेत चोचवर करून आ.. आ असा आवाज करत आपल्या वेदनांकडे लक्ष वेधून घेत होता. त्याच्या वेदनांकडे पहिल्यांदा दुर्लक्ष करणाऱ्या वनविभागाने अखेर त्याला ताब्यात घेतले.

टॅग्स :forestजंगलCrime Newsगुन्हेगारी