जलयुक्त शिवार योजनेचा जलसंधारणमध्ये ‘पाझर’
By Admin | Updated: January 9, 2016 00:01 IST2016-01-09T00:00:20+5:302016-01-09T00:01:37+5:30
समिती सदस्यांना जादाच्या निधीचे वाटप?

जलयुक्त शिवार योजनेचा जलसंधारणमध्ये ‘पाझर’
जलयुक्त शिवार योजनेचा जलसंधारणमध्ये ‘पाझर’समिती सदस्यांना जादाच्या निधीचे वाटप?
नाशिक : जिल्हा परिषदेच्या सेस निधीमधून जलयुक्त शिवार योजनेसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या निधीतून सीमेंट क्रॉँकीट बंधाऱ्यासह अन्य जलसंधारणाची कामे मंजूर करण्यात आली आहेत. अडीच कोटींच्या निधीतून सर्वाधिक निधी जलसंधारण समिती सदस्यांना वितरित करण्यात आल्याचे
समजते.
काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या ८० लाखांच्या व्याजाच्या निधीचे काही ठरावीक पदाधिकारी व सदस्यांनी आपापसात वाटून घेण्याचा प्रयत्न केला असता तो महिला सदस्यांनी एकत्र येऊन हा प्रयत्न हाणून पाडला. त्या निधीचे मागील काळात शून्य निधी वाटप झालेल्या महिला सदस्यांच्या गटात जादाचा तसेच उर्वरित निधी सर्व महिला सदस्यांमध्ये समान वाटपाचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. त्याचवेळी जिल्हा परिषद सेस निधीच्या वार्षिक अंदाजपत्रकांपैकी एकूण १० टक्के निधी जलयुक्त शिवार योजनेसाठी राखीव ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेला दिले होते. त्यावेळी सदस्यांनी सेसच्या निधीतून असा १० टक्के निधी राखीव ठेवण्यास विरोध केला होता; मात्र विभागीय आयुक्तांचे आदेश असल्याचे सांगत प्रशासनाने हा निधी राखीव ठेवला होता. आता जलयुक्त शिवार योजनेतील निधीचे वितरण करताना जलसंधारण समितीमध्ये कार्यरत असलेल्या काही माजी पदाधिकाऱ्यांसह विद्यमान पाच सदस्यांना जादाचा निधी वितरित करण्यात आल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे. ज्या पाच सदस्यांना जादाचा निधी वितरित करण्यात आल्याची चर्चा आहे त्यातील एका माजी पदाधिकाऱ्याने यापूर्वीही विकासकामांसाठी प्राप्त असलेला निधी अर्थपूर्ण वाटाघाटीनंतर अन्य दुसऱ्याच गटात वितरित केल्यानंतर मागे बरेच वादळ उठले होते. आताही जलसंधारण समितीच्या दोन महिला सदस्यांसह तीन जिल्हा परिषद सदस्यांना जादाच्या निधीचे वाटप करण्यात आल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)
दारणा संगम येथे इसमाचा मृतदेह
नाशिकरोड : चेहेडी पंपिंग दारणा संगम महादेव मंदिरासमोर दारणा नदीपात्रात गुरुवारी दुपारी एक अनोळखी ४०-५० वर्षीय इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. मयत इसमाची ओळख पटली नसून या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.