शहरात बोगस आर्किटेक्टचा भरणा
By Admin | Updated: June 27, 2014 00:20 IST2014-06-26T21:08:18+5:302014-06-27T00:20:17+5:30
शहरात बोगस आर्किटेक्टचा भरणा

शहरात बोगस आर्किटेक्टचा भरणा
नाशिक, दि. २६ : रस्त्याने जाताना एखादी इमारत लक्ष वेधून घेते. त्याचे डिझाईन मोहक असते, त्यामुळेच त्या निर्जीव इमारतीतही सौंदर्य निर्माण होते. त्या इमारतीच्या आत गेल्यावर आतील संरचनाही प्रसन्न वातावरण निर्मिती साधणारी असते. मात्र त्या इमारतीला सौंदर्य प्रदान करण्यामागे सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती आर्किटेक्टची. आर्किटेक्ट आपल्या कलात्मक दृष्टीने आणि परिपुर्ण ज्ञानाने त्या इमारतीला सौदर्य प्राप्त करून देतो. ऐवढेच काय तर कमी जागेतही जागेचा महत्तम उपयोग करून आर्किटेक्ट चांगले डिझाईन्स तयार करून अधिकृत बांधकाम क्षेत्रात इमारत उभी करतो. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये, या क्षेत्रात देखील तोतयागिरी आल्याने ‘कोणीही यावे अन् आर्किटेक्ट बनावे’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. ‘द इंडियन इन्स्टिट्यूट आर्किटेक्चर नाशिक’ या संस्थेकडे सद्यस्थितीत ३५० आर्किटेक्टची नोंदणी आहे. मात्र शहरात आजच्या घडीला कित्येक मंडळी स्वत:ला आर्किटेक्ट म्हणून मिरवत असल्याचा दावा संस्थेकडून करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या बोगस आर्किटेक्टची यादी संस्थेने तयार केली असून, लवकरच यांची पोलखोल केली जाणार असल्याचेही संस्थेने स्पष्ट केले आहे.