शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

देवळा, येवल्यात पैसे अदा : मनमाडला संचालकांची तयारी दोन बाजार समित्यांवर टांगती तलवार कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 1:20 AM

नाशिक : शेतकऱ्यांकडून माल खरेदी करूनही त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाºया व्यापाºयांना पाठीशी घालणाºया पाचपैकी देवळा व येवला बाजार समित्यांच्या संचालकांनी व्यापाºयांकडे शेतकºयांचे थकलेले पैसे परत केल्यामुळे पदांना तूर्त अभय मिळाले.

ठळक मुद्देशेतकºयांचे पैसे परत करण्यासाठी अनामत भरण्याची तयारीव्यापाºयांनी शेतकºयांचे पैसे अदा न केल्याच्या तक्रारी

नाशिक : शेतकऱ्यांकडून माल खरेदी करूनही त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाºया व्यापाºयांना पाठीशी घालणाºया पाचपैकी देवळा व येवला बाजार समित्यांच्या संचालकांनी व्यापाºयांकडे शेतकºयांचे थकलेले पैसे परत केल्यामुळे पदांना तूर्त अभय मिळाले असून, मनमाड बाजार समितीच्या संचालकांनीच शेतकºयांचे पैसे परत करण्यासाठी अनामत भरण्याची तयारी दर्शविली, तथापि, मालेगाव व उमराणे बाजार समित्यांच्या प्रयत्नांना व्यापाºयांकडून दाद मिळत नसल्याने त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.या संदर्भात सहकार खात्याने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीवर जूनच्या दुसºया आठवड्यांत सुनावणी होणार आहे. मालेगाव, देवळा, उमराणे, मनमाड व येवला या पाच बाजार समित्यांमध्ये कार्यरत व्यापाºयांनी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत बाजार समितीत लिलावासाठी शेतमाल घेऊन आलेल्या शेतकºयांकडून मालाची खरेदी केली व त्याबदल्यात शेतकºयांना धनादेश किंवा आरटीजीएस करण्याचे आश्वासन दिले. व्यापाºयांनी शेतकºयांचे पैसे अदा न केल्याच्या तक्रारी सहकार विभागाकडे करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात साधारणत: २० व्यापाºयांनी १४१९ शेतकºयांचे ४ कोटी ९५ लाख रुपये थकविले असून, अशा व्यापाºयांवर कारवाई करण्याचे आदेश बाजार समित्यांना देऊनही त्यांनी त्याची दखल न घेता उलट त्यांना अभय दिले. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी व्यापाºयांना परवाने देताना बाजार समित्यांनी कायदा व नियमांना हरताळ फासल्याचा आक्षेप घेत पाचही बाजार समित्यांच्या संचालकांना नोटिसा बजावून त्यांचे संचालकपद रद्द का करण्यात येऊ नये, अशी विचारणा केली होती व त्यावर संचालकांना लेखी म्हणणे मांडण्यासाठी येत्या ११ मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. या नोटिसीमुळे अडचणीत आलेल्या संचालकांनी ज्या व्यापाºयांनी शेतकºयांचे पैसे थकविले त्यांचा शोध घेऊन शेतकºयांचे थकीत पैसे परत करण्यासाठी तगादा लावल्यामुळे येवला व देवळा येथील शेतकºयांचे पैसे व्यापाºयांनी परत केले आहेत, तर मनमाड बाजार समितीच्या संचालकांनी शेतकºयांचे व्यापाºयांकडे थकलेले पैसे परत करण्याची हमी घेत तेव्हढी रक्कम बाजार समितीत अनामत म्हणून जमा करण्याची तयारी दर्शविली आहे. ज्यावेळी व्यापाºयांकडून पैसे येतील त्यावेळी संचालक आपली अनामत रक्कम परत घेतील. मात्र मालेगाव व उमराणे या दोन बाजार समितीत अनुक्रमे ८६९ शेतकºयांचे २ कोटी ९६ लाख ७६ हजार व १३५ शेतकºयांचे १ कोटी ३८ लाख थकल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी दिली आहे.