व्यसनमुक्ती पुरस्काराने पवार यांचा गौरव
By Admin | Updated: July 28, 2014 23:28 IST2014-07-28T22:37:36+5:302014-07-28T23:28:22+5:30
व्यसनमुक्ती पुरस्काराने पवार यांचा गौरव

व्यसनमुक्ती पुरस्काराने पवार यांचा गौरव
सिन्नर : कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सूर्योधन पवार यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राज्यमंत्री संजय सावकारे व मराठी सिनेअभिनेता सिध्दार्थ जाधव यांच्या हस्ते पवार यांना प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. पवार यांना सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल बाजार समितीच्या वतीने सभापती कचरू डावखर, सचिव आर. एन. जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)
’ नाशिक : जनता विद्यालयात प्राचार्य बाळासाहेब पवार यांच्या हस्ते वृक्षदिंडीचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी यावेळी पर्यावरणविषयक घोषणा देऊन जनजागृती केली.