नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) सदस्य पदासाठी विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. अमित मायदेव, डॉ. बी. वाय. माळी, डॉ. पांडुरंग जाधव, डॉ. राज गजभिये, डॉ. आशुतोष गुप्ता व वैद्य प्रभाकर पवार यांची नामनिर्देशिक सदस्य म्हणून निवड केल्याची माहिती कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिली आहे.मुंबई विभागातून डॉ. अमित मायदेव, पुणे विभागातून डॉ. बी. वाय. माळी, औरंगाबाद विभागातून डॉ. पांडुरंग जाधव, नागपूर विभागातून डॉ. राज गजभिये, अमरावती विभागातून डॉ. आशुतोष गुप्ता व नाशिक विभागातून वैद्य प्रभाकर पवार यांना नामनिर्देशित सदस्य होण्याचा मान मिळाला आहे.
पवार यांच्यासह सिनेटवर सहा नामनिर्देशित सदस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:17 IST