पवन पवार भाजपातून रिपाइंत
By Admin | Updated: July 9, 2017 00:31 IST2017-07-09T00:31:07+5:302017-07-09T00:31:20+5:30
नाशिक : माजी नगरसेवक पवन पवार यांनी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) पक्षात प्रवेश केला.

पवन पवार भाजपातून रिपाइंत
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : काही महिन्यांपूर्वीच भाजपात प्रवेश केलेले माजी नगरसेवक पवन पवार यांनी शनिवारी (दि.८) रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) पक्षात राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले पवन पवार यांना भाजपात घेण्यावरून भाजपा शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्यावर टीकेचा भडिमार झाला होता. काही दिवसांपूर्वीच आरपीआयच्या एका गटाने पवार यांना आरपीआयमध्ये घेण्याबाबत तसेच थेट जिल्हाध्यक्षपदी निवड करण्याचा ठरावही संमत केला होता. मात्र हा ठराव खोडसाळपणाचा असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांनी पवन पवार यांना पक्षात प्रवेश दिला. यावेळी पवन पवार यांच्यासह जमील सय्यद व प्रा. प्रताप मैंदीकर यांनी आरपीआयमध्ये प्रवेश केला. पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, शहराध्यक्ष पवन क्षीरसागर आदी उपस्थित होते.