वणी येथील पवार पतसंस्थेवर प्रशासक नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2016 22:02 IST2016-01-21T22:02:06+5:302016-01-21T22:02:43+5:30
वणी येथील पवार पतसंस्थेवर प्रशासक नियुक्त

वणी येथील पवार पतसंस्थेवर प्रशासक नियुक्त
वणी : येथील शरदरावजी पवार नागरी सहकारी पतसंस्थेवर सहकारी संस्थेच्या विभागीय सहनिबंधकांच्या आदेशान्वये विभागीय अधिकारी व इतर दोन सदस्यांची नियुक्ती करण्याबाबतचे लेखी पत्र जिल्हा उपनिबंधक व संलग्न तत्सम घटकांना देण्यात आले असून संस्थेच्या बिकट आर्थिक स्थितीमुळे आता यापुढचा कारभार प्रशासकीय मंडळाने पाहण्याचे आदेशात नमूद केले आहे.
ही पतसंस्था नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमीटेड नाशिक या बँकेची कर्जदार असून सदर कर्ज थकीत झाल्याने थकबाकी वाढली आहे. याबाबत बँकेने वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांबरोबर सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग मुंबई यांच्याशी पत्रव्यवहार करून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७७ अ अन्वये लेखी आदेश या संदर्भात प्राप्त केला. आर्थिक अनियमिततेमुळे अडचणीत सापडलेल्या संस्थेचा कारभार सहायक निबंधक महेश भडांगे यांच्याकडे सोपविण्यात आला. प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) म्हणून ते कामकाज पाहत होते; मात्र नाशिक जिल्हा बँकेने बँक प्रतिनिधीची नियुक्ती करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे मागणी केली, वास्तविक स्थिती पाहून प्रशासकीय मंडळाच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत.(वार्ताहर)