शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

पवन एक्सप्रेस दुर्घटना : दहा गाड्यांचा मार्ग बदलला, तपोवन, विदर्भ एक्सप्रेस ‘शॉर्ट टर्मिनेट’, अकरा गाड्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 20:02 IST

पंचवटी, राज्यराणी, नंदीग्रामसह अकरा गाड्या रद्द

नाशिक : देवळाली कॅम्प ते घोटी दरम्यान लोहशिंगवे गावजवळ मुंबईकडून बिहारच्या जयनगरला जाणाऱ्या लोकमान्य टिळक जयनगर गाडीचे (पवन एक्सप्रेस) दहा ते बारा डबे रुळावरून घसरले. रविवारी (दि.३) दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यामुळे मध्य रेल्वेकडून अकरा गाड्या रद्द करण्यात आल्या तर दहा रेल्वेगाड्यांचा मार्ग अपात्कालिन स्थितीत बदलण्यात आला आहे.

पवन एक्सप्रेसला झालेल्या अपघातामुळे मुंबईहुन सुटणारी देवगिरी एक्सप्रेस, हुजुरसाहिब नांदेड राज्यराणी एक्सप्रेस, नंदीग्राम एक्सप्रेस, अमरावती एक्सप्रेस, पुरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच हावडा दुरांतो एक्सप्रेस, हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस, उद्योगनगरी एक्सप्रेस, सुलतानपुर सुपरफास्ट एक्सप्रेस, पंजाब मेल, पटना-जनता एक्सप्रेस, सेवाग्राम या सर्व गाड्यांचा मार्ग बदलण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. तसेच पंचवटी एक्सप्रेस (१२१०९/१०), नंदीग्राम (११४०१), हुजुरसाहिब नांदेड राज्यराणी (१७६११/१२), पुरी सुपरफास्ट (१२१४५/४६), अमरावती सुपरफास्ट (१२१११), मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस (१२११२), अजमेर शताब्दी एक्सप्रेस (१२०१५), देवगिरी एक्सप्रेस (१७०५७) या सर्व रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. विदर्भ सुपरफास्ट एक्सप्रेस (१२०१६), देवगिरी एक्सप्रेस (१७५८), नंदीग्राम (११४०२), तपोवन एक्सप्रेस (१७६१८) या चार रेल्वेगाड्यांचा प्रवास अर्ध्यावरच (शॉर्ट टर्मिनेट) थांबला आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, दादर, ठाणे, इगतपुरी जंक्शन, नाशिकरोड, मनमाड, भुसावळ या सर्व रेल्वेस्थानकावर रेल्वे प्रशासनाकडून अपात्कालिन चौकशी व मदत केंद्र तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आले आहेत. या केंद्रांवरुन प्रवाशांना विविध मार्गावरील रेल्वेगाड्या व दुर्घटनेमुळे प्रभावित झालेल्या रेल्वेगाड्या व त्यांच्या वेळापत्रकात आणि मार्गात करण्यात आलेले बदलांविषयीची माहिती दिली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे