शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

गर्भवतीच्या मदतीला धावले गस्तीपथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 00:37 IST

नाशिक : वेळ - पहाटे ३ वाजेची... ठिकाण, गंगापूर गाव...एक वृद्ध दाम्पत्य गर्भवती महिलेला धरून पायी चालत असल्याचे नजरेस ...

ठळक मुद्देवाहनातून पोहोचविले रुग्णालयात गंगापूर पोलिसांनी घडविले माणुसकीचे दर्शन

नाशिक : वेळ - पहाटे ३ वाजेची... ठिकाण, गंगापूर गाव...एक वृद्ध दाम्पत्य गर्भवती महिलेला धरून पायी चालत असल्याचे नजरेस पडते... पोलिसांच्या वाहनाचा दिवा चमकलेला बघताच ते  थबकतात... रात्र गस्तीचे पोलीस वाहन थांबते अन‌् कर्मचारी खाली उतरतात... बघतात  तर  गर्भवती स्त्रीला प्रसूती कळा सुरू झाल्या आहेत. तत्काळ ते वाहनातून बिनतारी संदेश नियंत्रण कक्षाला देतात आणि परवानगी घेत त्वरित त्या वृद्ध दाम्पत्यासह गर्भवती महिलेला  गिरणारे ग्रामीण रुग्णालयापर्यंत पोहोचवतात.सोमवारी पहाटेच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाण्याचे पीटर मोबाइल नेहमीप्रमाणे रात्रगस्तीवर होते. यावेळी पहाटेच्या तीन वाजेच्या सुमारास एक वृद्ध दाम्पत्य एका गर्भवती महिलेसोबत पायी जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तत्काळ सहायक पोलीस निरीक्षक नितीन पवार यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला बिनतारी संदेश यंत्राद्वारे माहिती दिली, तसेच अतिरिक्त मदत म्हणून गुन्हे शोध पथकाच्या वाहनालाही पाचारण केले.   पोलीस नाइक गिरीश महाले, राहुल सोळसे यांच्या मदतीने त्वरित गुन्हे शोध पथकाच्या वाहनात भारती जाधव (२३) आणि त्यांचे सासू-सासरे यांना वाहनचालक दत्तात्रय उगले यांनी गिरणारे रुग्णालयात अगदी कमी वेळेत दाखल केले. पहाटेची वेळ असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे वाहन गंगापूर गावापासून उपलब्ध होत नसल्याने, ते वृद्ध सासू-सासरे हे आपल्या सुनेला पायीच घेऊन रस्त्यावर आले होते आणि योगायोग असा की, रात्रीच्या गस्तिपथकाचे याकडे लक्ष वेधले गेले.एखाद्या देवदूताप्रमाणेच त्यांनी या महिलेच्या मदतीला धावून जात मानवी संवेदना पोलीस दलात जागृत असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. रात्रीच्या सुमारास पोलीस यंत्रणेकडून दाखविण्यात आलेले मदतकार्य हा कर्तव्याचा भाग असला तरी ऐनवेळी यंत्रणा कामाला लागल्याने माता आणि बालक सुखरुप असल्याचे समाधान पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केले. या कामी प्रयत्न करणाऱ्या पोलिसांचा गौरवदेखील केला जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल यांनी सांगितले. गोंडस कन्येला दिला जन्मगिरणारे ग्रामीण रुग्णालयात जाधव यांची यशस्वीरीत्या प्रसूती झाली. त्यांनी एका गोंडस कन्येला जन्म दिला. त्यांच्या सासू-सासऱ्यांनी पोलिसांना वेळीच मदत केल्यामुळे धन्यवाद दिले. पोलिसांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अंचल मुदगल यांनी या गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना प्रशस्तिपत्रक देणार असल्याचे सांगितले. 

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसpregnant womanगर्भवती महिला