पाटील यांची बदली, कुशवाह नवे जिल्हाधिकारी

By Admin | Updated: February 7, 2015 00:05 IST2015-02-07T00:01:31+5:302015-02-07T00:05:08+5:30

पाटील यांची बदली,कुशवाह नवे जिल्हाधिकारी

Patil's replacement, Kushwaha new District Collector | पाटील यांची बदली, कुशवाह नवे जिल्हाधिकारी

पाटील यांची बदली, कुशवाह नवे जिल्हाधिकारी


नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा चार महिन्यांवर येऊन ठेपलेला असताना जिल्हाधिकारी विलास पाटील यांची पुन्हा अचानक बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी सांगलीचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंग कुशवाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील यांची यापूर्वीही बदली करण्यात आली होती, परंतु कुंभमेळ्याचे कारण देत राज्य सरकारनेच ती रद्द केली होती, आताही त्याबाबत संदिग्धता कायम आहे. नोव्हेंबरमध्येच विलास पाटील यांनी राज्य सरकारकडे विनंती बदलीसाठी अर्ज केला होता. त्यानुसार त्यांची बदली करून त्या जागी श्रीमती अश्विनी जोशी यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु विभागीय आयुक्तांनी सिंहस्थ कुंभमेळ्याचे कारण दाखवून पाटील यांच्या बदलीला प्रतिकूलता दर्शविल्याने दुसऱ्याच दिवशी ही बदली रद्द केली होती.

Web Title: Patil's replacement, Kushwaha new District Collector