पाटीलनगर, सिडको : उंटवाडी पुलाखाली उभारा भुयारीमार्ग; चक्रीबसची संख्या वाढवा
By Admin | Updated: March 13, 2015 23:41 IST2015-03-13T23:40:47+5:302015-03-13T23:41:07+5:30
कुठे आहे सार्वजनिक स्वच्छतागृह ?पाटीलनगर,

पाटीलनगर, सिडको : उंटवाडी पुलाखाली उभारा भुयारीमार्ग; चक्रीबसची संख्या वाढवा
सिडको : पेठे हायस्कूलमागील दत्तमंदिर परिसरात वाढती लोकवस्ती लक्षात घेता सार्वजनिक स्वच्छतागृह आणि महिलांसाठी प्रसाधनगृहाची उभारणी करावी, रस्त्यांवर वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने गतिरोधक बसवावेत, चक्रीबस सेवेत वाढ करावी, उंटवाडी पुलाखाली भुयारीमार्गाची उभारणी व्हावी...आदिंसह विविध समस्यांचा वर्षाव नागरिकांनी ‘लोकमत तुमच्या दारी’या उपक्रमात बोलताना केला.
‘लोकमत’च्या टीमचा मुक्काम शुक्रवारी सिडकोतील पाटीलनगर, दत्तमंदिर परिसरात होता. यावेळी परिसरातील नागरिकांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांसंदर्भात आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. प्रामुख्याने, पाटीलनगर, त्रिमूर्तीचौक, शिवशक्तीनगर, दुर्गानगर आदि परिसरात लोकवस्ती वाढते आहे; परंतु सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा नसल्याने नागरिकांची गैरसोय होते. विशेषत: महिलांची कुचंबणा होते. परिसरातील नागरिकांची नेहमीच उंटवाडी पुलावरून ये-जा सुरू असते. परिसरातच पेठे शाळा असल्याने शालेय मुलांचीही वर्दळ असते; परंतु पुलावरून ये-जा करताना अनेकदा अपघात घडले आहेत. त्यामुळे उंटवाडी पुलाखाली भुयारीमार्गाची उभारणी झाल्यास अपघातांना आळा बसू शकेल. परिसरातील स्वच्छतेबाबतही नागरिकांची ओरड आहे. चक्रीबससेवा सुरूकरण्याची गरज आहे.