शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

ड्रीम प्रोजेक्टलाच पाटील यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 01:19 IST

महापौरपदाची निवडणूक झाल्यानंतर आता भाजपत राजी- नाराजीचे सूर उमटण्यास प्रारंभ झाला असून, राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी निओ मेट्रो तसेच होऊ घातलेली शहर बस वाहतूक सेवा आणि मखमलाबाद येथील हरित क्षेत्र विकास प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी शुक्रवारी (दि.२९) केली आहे. त्यांनी यासंदर्भात महापौर आणि आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यामुळे या विषयावरील वादाला भाजपतच सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देभाजपमध्ये दुफळी : मेट्रो, बससेवा, हरितक्षेत्र रद्द करण्याची मागणी

नाशिक : महापौरपदाची निवडणूक झाल्यानंतर आता भाजपत राजी- नाराजीचे सूर उमटण्यास प्रारंभ झाला असून, राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी निओ मेट्रो तसेच होऊ घातलेली शहर बस वाहतूक सेवा आणि मखमलाबाद येथील हरित क्षेत्र विकास प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी शुक्रवारी (दि.२९) केली आहे. त्यांनी यासंदर्भात महापौर आणि आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यामुळे या विषयावरील वादाला भाजपतच सुरुवात झाली आहे.राज्यात आणि केंद्राची सत्ता असताना हे तिन्ही प्रकल्प नाशिकसाठी मंजूर झाले आहेत. त्यात मेट्रो निओ हा प्रकल्प देशातील पहिला टायर बेस्ड मेट्रोचा प्रयोग असून २०२४ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. त्यासाठी महापालिकेने जागा देणार असल्याने आर्थिक सहभाग मागू नये, अशी महापालिकेची भावना होती.मात्र, राज्य शासनाने निर्णय घेताना नाशिक महापालिकेला १०२ कोटी रुपयांचा सहभाग देण्यास बाध्य केले आहे. मात्र, नाशिक महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी दिनकर पाटील यांनी केली आहे.महापालिकेच्या वतीने बससेवा सुरू करण्यात येणार असून आता पाटील यांनी त्यास विरोध केला आहे. महापालिकेने बससेवा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर बससेवेसाठी अनेकदा निविदा मागवण्यात आल्या. परंतु प्रतिसाद मिळत नाही. मात्र ही खर्चिक योजना असून तोट्यात चालणारी सेवा आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने विकासकामांना निधी प्राप्त होत नाही. अशा स्थितीत ही सेवा चालवणे खर्चिक ठरणार आहे. त्यामुळे बससेवेचा पांढरा हत्ती पोसण्यापेक्षा त्यासाठी होणारा खर्च हा विकासकामांवर खर्च करावा, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथे हरित क्षेत्र विकास प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांची संमती असल्याशिवाय हा प्रकल्प राबविण्यात येऊ नये असेदेखील पाटील यांनी नमूद केले आहे. त्यामुळे भाजपत आता वेगळे वाद सुरू झाल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपाPoliticsराजकारण