व्याधिग्रस्तांनी लसीकरण करून घ्यावे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:25 IST2021-05-05T04:25:19+5:302021-05-05T04:25:19+5:30
घरातील ज्येष्ठांमध्ये नागरिक प्रामुख्याने व्याधिग्रस्त असतात ते बाहेरही पडत नाहीत. मात्र घरातील अन्य बाहेर जाणाऱ्या मंडळींकडून घरात आल्यानंतर योग्य ...

व्याधिग्रस्तांनी लसीकरण करून घ्यावे!
घरातील ज्येष्ठांमध्ये नागरिक प्रामुख्याने व्याधिग्रस्त असतात ते बाहेरही पडत नाहीत. मात्र घरातील अन्य बाहेर जाणाऱ्या मंडळींकडून घरात आल्यानंतर योग्य ती खबरदारी न घेतल्यास अशा ज्येष्ठांना आणि हृदयरोग असणाऱ्यांना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे ज्या ज्येष्ठांना संसर्गापासून कसे दूर ठेवावे याची काळजी सर्वांनीच घ्यायची आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आणि व्याधिग्रस्तांनी सर्वात आधी लसीकरण करून घेण्याची गरज आहे. हृदयविकार असेल तर लसीकरण केल्यानंतर दुष्परिणाम होतात असा एक गैरसमज आहे. कारण अशा रुग्णांना रक्त पातळ करण्याच्या गोळ्या दिलेल्या असतात. त्यामुळे लसीकरणाच्या वेळी रक्तस्त्राव होऊ शकतो. यासंदर्भात आपल्या नित्याच्या हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नागरिकांना सहज लस घेता येते. लसीचे दोन डोस न विसरता घ्यावे आणि ते घेतल्यानंतर आता कोरोना संसर्ग होणार नाही, असा गैरसमज न बाळगता काळजी घेतली पाहिजे.
इन्फो..
- व्यायाम तसेच जॉगिंग करण्यासाठी सकाळीच काय; परंतु अन्य वेळीही बाहेर जाऊ नये.
- व्यायाम केल्याने अथवा जॉगिंग केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते हे खरे असले तरी सध्या घरीच व्यायाम करावा.
- संसर्गबाधित झालेच तर तत्काळ उपचारासाठी दाखल व्हावे. त्यावेळी हृदयरोगावरील उपचारांची पूर्वकल्पना उपचार करणाऱ्या डॉक्टरांना द्यावी.
- रुग्णालयातदेखील उपचार सुरू असताना हृदयविकारासाठी दिलेल्या गोळ्या तेथील वैद्यकीय सल्ल्याने घ्याव्यात
- रुग्णालयातदेखील स्वच्छता आणि सुरक्षितता असेल याची काळजी घ्यावी.
-------
डॉ. सुरेश सूर्यवंशी, हृदयरोग तज्ज्ञ
छायाचित्र आर फोटोवर ०४ सुरेश सूर्यवंशी नावाने सेव्ह...
===Photopath===
040521\04nsk_50_04052021_13.jpg
===Caption===
सुरेश सूर्यवंशी