शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी
2
तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध; भाजपचे सर्वाधिक ४३, शिंदेसेनेचे १९; ...तर आयोग करणार तपास
3
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जानेवारी २०२६ : दिवस अत्यंत आनंददायी, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल!
5
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
6
बिनविरोधचे हसू अन् बंडखोरीचे आसू; महामुंबईतील मोजके बंडखोरही सत्ताधाऱ्यांचेच; अनेकांनी घेतली माघार
7
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
8
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
9
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
10
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
11
कृतिशील, निर्मितीशील असणे हेच जीवनाचे इतिवृत्त - तारा भवाळकर
12
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
13
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
14
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
15
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
16
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
17
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
18
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
19
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
20
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांचे हाल : स्ट्रेचरवरून नेताना येतात अडथळे; शवविच्छेदन कक्षाच्या वाटेवर खड्डे जिल्हा रुग्णालयात अडथळ्यांची शर्यत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:30 IST

येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरून वाहनतळ हलविण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे; मात्र यासाठी उपाहारगृहापुढे रस्त्यावर लावलेल्या रेलिंगमुळे मुख्य प्रवेशद्वारावरून पाठीमागील बाजूस असलेल्या शवविच्छेदन कक्षाकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.

ठळक मुद्देरस्त्याची प्रचंड दुरवस्थानागरिकांमध्ये संताप व्यक्त नातेवाईकांना अनेक अडचणींना तोंड

नाशिक : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरून वाहनतळ हलविण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे; मात्र यासाठी उपाहारगृहापुढे रस्त्यावर लावलेल्या रेलिंगमुळे मुख्य प्रवेशद्वारावरून पाठीमागील बाजूस असलेल्या शवविच्छेदन कक्षाकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया कक्षाच्या जवळून अंतर्गत रस्त्याने मृतदेह शवविच्छेदन कक्ष व शवगृहाकडे नेले जातात; मात्र यावेळी स्ट्रेचरवरून मृतदेह जमिनीवर पडण्याचा धोका संभवतो; कारण सदर रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे.सदर रस्त्यावरील डांबर नाहीसे झाल्याने खडतर रस्त्यावरून स्ट्रेचर ढकलताना अधिक ताकद लावावी लागते, अशावेळी मृतदेह स्ट्रेचरवर प्रचंड प्रमाणात हलून खाली पडण्याची शक्यता निर्माण होते. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात रस्त्यांचे डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्याची गरज आहे; मात्र याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे तीव्र नाराजी व्यक्त होत असून, शवविच्छेदनासाठी मृतदेह घेऊन जाताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे रस्त्याचे डांबरीकरण करणे गरजेचे असल्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्याचप्रमाणे पाठीमागील बाजूस काही पथदीप बंद असल्यामुळे अंधाराचे साम्राज्य वाढत आहे. रात्रीच्या वेळी अपघातांमध्ये मयत झालेल्या व्यक्तींचे मृतदेह शवगृह किंवा शवविच्छेदन कक्षात घेऊन जाताना तारेवरची कसरत करावी लागते. कारण रस्त्याची झालेली दुर्दशा आणि अंधार यामुळे जे कर्मचारी स्ट्रेचरवरून मृतदेह सुरक्षितरीत्या पोहचवितात ते कौतुकास पात्र आहे.कारण सहसा मृत इसमांचे नातेवाइकांपैकीदेखील कोणी यावेळी धाडस करत नाही. शवविच्छेदन कक्षापर्यंत किंवा शवगृहापर्यंत जाण्यासाठी मृत व्यक्तीचे नातेवाईक स्ट्रेचर ढकलण्यास मदतदेखील करीत नाही. काही अपवाद वगळता असेच चित्र असते. जिल्हा शासकीय रुग्णालयात येणाºया रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.स्ट्रेचरची चाके फिरतात कमी अन् आवाज जास्तजिल्हा रुग्णालयात नवीन चांगल्या दर्जाचे स्ट्रेचर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मोजके स्ट्रेचर जिल्हा रुग्णालयात असून, त्यांचीही दुरवस्था कमालीची झाली आहे. स्ट्रेचर ढकलताना त्यांची चाके फिरतात कमी अन् आवाज इतका प्रचंड असतो की आजूबाजूच्या लोकांना कानावर हात ठेवावा लागतो, तर विविध कक्षांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्याही मनात धडकी भरते. यामुळे स्ट्रेचरची दुरुस्ती करण्यापेक्षा नवीन चांगल्या दर्जाचे स्ट्रेचर प्रशासनाने खरेदी करावेत, अशी मागणी होत आहे. कारण स्ट्रेचरचा वापर जिल्हा रुग्णालयात अधिक होतो. सातत्याने रुग्णांचा वाढता ताण या रुग्णालयावर आहे.