पाथर्डी-वडनेर रस्ता बनला धोकादायक

By Admin | Updated: March 30, 2016 22:59 IST2016-03-30T22:58:56+5:302016-03-30T22:59:19+5:30

रुंदीकरण : दुभाजक, गतिरोधक बनविण्याची मागणी

Pathardi-Wadner road becomes dangerous | पाथर्डी-वडनेर रस्ता बनला धोकादायक

पाथर्डी-वडनेर रस्ता बनला धोकादायक

पाथर्डी फाटा : पाथर्डी फाटा ते वडनेरगेट दरम्यानचा रस्ता दुरुस्ती व रुंदीकरणानंतर अपघातांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढू लागल्याने सामान्य नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रुंदीकरण करण्यात आलेल्या या रस्त्यावर दुभाजक न टाकल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरत आहे. येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या मामा-भाच्याचा जागीच मृत्यू झाला होता.
पाथर्डी फाटा ते वडनेरगेट दरम्यानच्या रस्त्यावर गेल्या पाच-सहा वर्षांत प्रचंड प्रमाणात रहदारी वाढली असून अरुंद रस्ता, अपघाती वळणं आणि रस्त्यांची दुरवस्था या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी हा रस्ता दुरुस्त करून रुंदीकरणाची मागणी लावून धरली होती. गेल्या वर्षीही मागणी मार्गी लावत मनपाने सिंहस्थाच्या कामांसोबत रस्ता दुरुस्त करून रुंदीकरण केले; मात्र दुभाजक न टाकल्याने अपाघाताचे प्रमाण वाढले आहे.
दुरुस्तीनंतर रूंद झालेल्या रस्त्यावरून वाहनं सुसाट वेगाने धावू लागली आहेत. दुभाजक नसल्याने आणि अनेक ठिकाणी धोकादायक वळणं असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहनांच्या नुकसानीसोबत अनेकांना जायबंदी व्हावे लागले आहे. रविवारी (दि.२७) झालेल्या अपघातात जीव गमवावा लागला.
वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे संतप्त नागरिकांनी काही काळ रास्ता रोकोही करण्याचा प्रयत्न केला, असे असूनही पाहिजे तिथे सूचना फलक, गतिरोधक आणि दुभाजक टाकले जात नसल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
आणखी अधिक बळी जाण्यापूर्वीच या रस्त्यावर दुभाजक टाकण्यात यावेत अशाी मागणी रवि गायकवाड, सागर देवरे, विजय सोनवणे, राहुल निकुंभ, योगेश नवले आदिंनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Pathardi-Wadner road becomes dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.