पाथर्डी फाट्यावर महिलेची सोनसाखळी खेचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:09 IST2021-03-29T04:09:26+5:302021-03-29T04:09:26+5:30

शनिवार (दि. २७) रोजी रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास पाथर्डी गावाकडून अश्विनी दरेकर (३१ मातोश्री बंगला, ज्ञानेश्वरनगर) या ...

Pathardi pulled the woman's gold chain over the fork | पाथर्डी फाट्यावर महिलेची सोनसाखळी खेचली

पाथर्डी फाट्यावर महिलेची सोनसाखळी खेचली

शनिवार (दि. २७) रोजी रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास पाथर्डी गावाकडून अश्विनी दरेकर (३१ मातोश्री बंगला, ज्ञानेश्वरनगर) या पाथर्डी फाट्याकडे पायी जात होत्या. यावेळी त्यांच्यासमोरून आलेल्या काळ्या रंगाच्या दुचाकीवरील इसमाने त्यांच्या गळ्यातील २० ग्रॅमची सोन्याची पोत सुमारे बळजबरीने खेचून पाथर्डी फाट्याच्या दिशेने पलायन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी दरेकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात सोनसाखळी चोराविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सोनसाखळी चोरीच्या घटना शहरात वारंवार घडत असून सोनसाखळी चोरांची टोळी मात्र पोलिसांच्या हाती लागत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. दररोज शहरातील १३ पैकी किमान एक किंवा दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून चाेरटे फरार होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Pathardi pulled the woman's gold chain over the fork