समाज प्रबोधनासाठी पथनाट्य प्रभावी माध्यम

By Admin | Updated: July 14, 2014 00:29 IST2014-07-13T23:30:01+5:302014-07-14T00:29:02+5:30

समाज प्रबोधनासाठी पथनाट्य प्रभावी माध्यम

Pathantra effective medium for social awakening | समाज प्रबोधनासाठी पथनाट्य प्रभावी माध्यम

समाज प्रबोधनासाठी पथनाट्य प्रभावी माध्यम

नाशिकरोड : समाज प्रबोधनासाठी पथनाट्यासारखे दुसरे प्रभावी माध्यम नाही. निरनिराळ्या विषयांवरची बारा पथनाट्ये विद्यार्थ्यांच्या हातात पडली तर त्यांना समाज प्रबोधन करणे सोपे होईल. प्रत्यक्ष रस्त्यावर, चौकात, खेडोपाडी जाऊन पथनाट्याद्वारे त्यांना संदेश देता येईल. सुधा डमरे लिखित ‘बारा पथनाट्ये’ या पुस्तकाने हे काम अधिकच सोपे केले आहे, असे प्रतिपादन प्राचार्य उदय शेवतेकर यांनी केले.
र. ज. चौहान बिटको गर्ल्स हायस्कूलच्या उष:काल हॉलमध्ये सुधा डमरे लिखित ‘बारा पथनाट्ये’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ लेखक व चित्रकार नीळकंठ नांदुरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक निरंजन कळमकर, पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलचे प्राचार्य उदय शेवतेकर आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाकरिता नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अ.ब. जामखेडकर यांनी मुंबईहून पाठविलेल्या संदेशाचे वाचन मीनाक्षी गोळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी ‘उमलत्या कळ्यांनो सावधान’ हे पथनाट्य सादर करण्यात आले. सूत्रसंचालन प्राची बेलन यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक मुग्धा कुलकर्णी, पुरोहित, सुनील हिंगणे, संदीप पगारे, आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Pathantra effective medium for social awakening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.