शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पांजरवाडी सरपंच सदस्य, ग्रामस्थांचे अमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 17:58 IST

येवला : आॅक्टोबर महिन्यात गावातील जुनी सार्वजनिक विहीर काही लोकांनी रात्रीच्या वेळेस बुजविल्यानंतर कुठलीही कारवाई संबधितांवर न झाल्याने मंगळवारी (दि.२६) पांजरवाडीगावच्या सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थानी पंचायत समिती कार्यालायसमोर अमरण उपोषणास सुरु वात केली आहे.

ठळक मुद्देगावातील जुनी विहीर बुजविणाऱ्यांवर कारवाईची मागणी

येवला : आॅक्टोबर महिन्यात गावातील जुनी सार्वजनिक विहीर काही लोकांनी रात्रीच्या वेळेस बुजविल्यानंतर कुठलीही कारवाई संबधितांवर न झाल्याने मंगळवारी (दि.२६) पांजरवाडीगावच्या सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थानी पंचायत समिती कार्यालायसमोर अमरण उपोषणास सुरु वात केली आहे.पांजरवाडी येथील दगडाच्या बांधकामात जुन्या काळातील सार्वजनिक विहीर होती. सदर विहिरींवरून गावातील लोक पाणी वापरत होते. सदर विहिरीची साफसफाई करण्यात यावी सर्वांची मागणी असतांना अचानक ही विहीर रात्रीतून गावातील काही लोकांनी बुजविली. या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधिक्षक, प्रांत, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना पांजरवाडीचे सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी चौकशी करुन कारवाईची मागणी केली होती. त्यावर कुठलीही कारवाई न झाल्याने सोमवारी सरपंच जन्याबाई गायकवाड, उपसरपंच मुक्ताबाई घोडेराव, सदस्य श्रीकांत आगवन, विरेश घोडेराव, जगन घोडेराव, शांताराम देवरे, अशोक घोडेराव, अशोक देवरे, बाळू देवरे, जिजाराम देवरे, सुरेश भगत, संजय आगवन, रावसाहेब देवरे, भागीनाथ गायकवाड, बाळू गांगुर्डे, संजय गांगुर्डे, भगवान घोडेराव, मच्छीन्द्र देवरे, उत्तम घोडेराव, रमेश देवरे, रामनाथ आगवन, एकनाथ देवरे, अंजना घोडेराव, रेणुका गांगुर्डे आदींसह ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले आहेत.गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक अशोक आडसरे यांना दोन वेळेस निवेदन देऊन सदरची विहीर ही ग्रामपंचायतीची सार्वजनिक मालमत्ता असताना का बुजविण्यात आली? बुजविण्यापूर्वी ग्रामसभेची परवानगी घेतली होती का? याचा खुलासा करण्यासंदर्भात मागील महिन्यात कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर ग्रामसेवकाने कुठलीही कारवाई केली नाही. सोमवारी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला सुरु वात झाल्यानंतर प्रभारी सभापती रु पचंद भागवत, गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या दालनात ग्रामसेवक अशोक आडसरे, उपोषणकर्ते सरपंच, सदस्य, विहीर बुजविणारे लोक यांची बैठक घेतली. त्यानंतर विहीर पुन्हा मोकळी करण्यासंदर्भात या बैठकीत एकमत झाले नाही.गटविकास अधिकाºयांनी सरपंचाच्या नावाने विहीर ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून उकरून घ्यावा असे लेखी पत्र दिले, मात्र लेखी पत्रावर ग्रामसेवकाचे नाव नसल्याने उपोषणकर्त्यांनी हे पत्र घेतले नाही. ग्रामसेवकही यानंतर पंचायत समिती कार्यालयातून निघून गेल्याने उपोषणावर रात्री उशिरापर्यंत तोडगा निघाला नव्हता.