शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याचे दर्शन की अफवा : गवताच्या शेतात फिरविले ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 18:07 IST

ट्रॅक्टरचालक सागर ताजनपुरे या युवकाला खबरदारीचा उपाय म्हणून वन्यप्राणी ‘रेस्क्य’ूचा संरक्षण सूट परिधान करण्यास सांगून शेतात ट्रॅक्टर फिरविला गेला. तरीदेखील बिबट्या नजरेस पडला नाही.

ठळक मुद्देबिबट्याचे दर्शन घडल्याचे वास्तव की अफवा?बिबट्या शेवटपर्यंत आढळून आला नाही

नाशिक : चेहडी शिवारातील बोरोडेमळा भागातून वनविभागाला बिबट्या नजरेस पडल्याची माहिती फोनवरून मिळते. नाशिक व बोरिवलीचे रेस्क्यू पथके लवाजम्यासहस घटनास्थळी पोहचतात. सुतळी बॉम्ब, अन् फटाक्यांची लड बांधावर लावली जाते; मळ्याभोवतालच्या घरांच्या गच्चीवरून वनक र्मचारी ‘ट्रॅन्क्यूलाईज गन’द्वारे बिबट्याला बेशुध्द करण्यासाठी निशाना धरतात; मात्र शेतात बिबट्याची हालचाल उशिरापर्यंत दिसून आली नाही. अखेर गवताच्या शेतात वनअधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ट्रॅक्टरसूध्दा फिरविण्यात आला; मात्र पदरी निराशाच आली.सामनगावरोड शासकिय तंत्रिनकेतन समोरील बोराडे मळा भागातील सिध्दीविनायक कॉलनीतील काही नागरिक व महिलांना मंगळवारी (दि.३०) सकाळी बिबट्याचे दर्शन झाले. ही माहिती वनविभागाला कळविण्यात आली. या ठिकाणी वनविभागाने बिबट्या जेरबंद करण्यासाठी मोहीम हाती घेतली. मात्र बिबट्या शेवटपर्यंत आढळून आला नाही. बिबट्याने बोराडे मळ्यातून शेजारील पाडुरंग दौंड यांच्या शेतातील जनावरांच्या गीन्नी गवतात आश्रय घेतल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला. मोहिमेचा मोर्चा या शेताकडे वळविला गेला. सुमारे दोन तास या भागात प्रयत्न करण्यात आले. मात्र बिबट्या गवतामधून बाहेर आला नाही. अखेर येथील नागरिकांच्या मदतीने शेतातील गवातामध्ये ट्रॅक्टर फिरविण्याचा निर्णय वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी घेतला. ट्रॅक्टरचालक सागर ताजनपुरे या युवकाला खबरदारीचा उपाय म्हणून वन्यप्राणी ‘रेस्क्य’ूचा संरक्षण सूट परिधान करण्यास सांगून शेतात ट्रॅक्टर फिरविला गेला. तरीदेखील बिबट्या नजरेस पडला नाही. एकूणच बिबट्याची हुलकावणी दारणाकाठालगत सुरूच आहे. यामुळे बोराडे व दोंड मळ्यात बिबट्याचे दर्शन घडल्याचे वास्तव की अफवा याविषयी प्रश्नचिन्ह कायम आहे. वनविभागाकडून या भागात नागरिकांचे प्रबोधन करत जनजागृतीफर बॅनर लावण्यात आले. तसेच संध्याकाळी या भागातील नागरिकांनी आपली व लहान मुलांची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागwildlifeवन्यजीव