पेस्ट कंट्रोल ठेक्यावरून आयुक्तांनी धरले धारेवर
By Admin | Updated: November 12, 2014 01:40 IST2014-11-12T01:39:57+5:302014-11-12T01:40:33+5:30
पेस्ट कंट्रोल ठेक्यावरून आयुक्तांनी धरले धारेवर

पेस्ट कंट्रोल ठेक्यावरून आयुक्तांनी धरले धारेवर
नाशिक : महापालिकेच्या पेस्ट कंट्रोल ठेकेदाराला आठ वेळा मुदतवाढ देण्याच्या विक्रमावरून पालिका आयुक्त चकित झाले असून, त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचे वृत्त आहे. नव्या ठेकेदारास जे काम नव्या दरानुसार परवडत नाही तेच काम सध्याच्या (जुन्या) ठेकेदाराला कसे परवडते, असा प्रश्न आयुक्तांनी केल्याचे वृत्त आहे.मनपाच्या वतीने डास निर्मूलनाचा ठेक्याची मुदत संपत असताना नवीन निविदा मागवण्यात आल्या. परंतु त्या तब्बल ६२ टक्के जादा दराची निविदा प्राप्त झाली आहे. त्यामुळे ही निविदा वादात पडली आहे. पालिकेच्या नियमानुसार दहा टक्क्यांपेक्षा जादा दराची निविदा मंजूर करता येत नाही. त्यामुळे फेरनिविदा मागवण्याचा प्रस्ताव आहे. दरम्यान, नवीन निविदेचा निर्णय होत नसल्याने जुन्याच ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ दिली जात असून, दरवेळी एक ते दीड महिना करता करता तब्बल आठवेळा निविदा मंजुरीचा विक्रम करण्यात आला आहे. डेंग्यूच्या साथीबाबत आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली, तेव्हा डॉ. प्रवीण गेडाम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नव्या ठेकेदाराला जे काम जादा दराने करावे लागते तेच काम जुन्या ठेकेदाराला प्रचलित दराने कसे परवडते, असा प्रश्न निर्माण झाला आहे.