‘पासवर्ड’चे लावले फलक : जिल्ह्यातला पहिला प्रयोग
By Admin | Updated: August 21, 2014 00:17 IST2014-08-20T23:10:21+5:302014-08-21T00:17:32+5:30
सिन्नर बस टर्मिनल बनले मोफत ‘वायफाय झोन’

‘पासवर्ड’चे लावले फलक : जिल्ह्यातला पहिला प्रयोग
सिन्नर : संपूर्ण राज्यभर आपल्या आकर्षक व देखण्या इमारतीमुळे नावलौकिक मिळविलेल्या सिन्नर बस टर्मिनलमध्ये आता मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने प्रवासी व महाविद्यालयीन युवकांना त्याचा फायदा होत
आहे.
गेल्या तीन वर्षांपूर्वी येथे आकर्षक बसस्थानक उपलब्ध झाले. बी.ओ.टी. तत्त्वावर बांधण्यात आलेल्या या बसस्थानकाची
तीन वर्षापासून देखभाल व स्वच्छतेची काळजी घेण्यात
आली आहे. येथे बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे हरवलेल्या बालिकेचा शोध लागला होता.
बसस्थानकात बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांच्या मनोरंजनासाठी एलसीडी बसविण्यात आले आहे. प्रवाशांना वेगवेगळ्या सुविधा देणात अग्रेसर असलेल्या या बस टर्मिनलमध्ये आता विद्यार्थी व प्रवाशांच्या सेवेसाठी मोफत वायफाय झोन निर्माण करण्यात आले आहे.
गेल्या सहा दिवसांपूर्वीच आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पृथ्वराज चव्हाण यांच्या हस्ते पासवर्ड टाकून मोफत वायफाय सुविधा सुरू करण्यात आली. या वायफायचा फायदा विद्यार्थ्यांसह प्रवासी घेऊ लागले आहेत.
वायफाय सुरू केल्यानंतर त्याची माहिती विद्यार्थी व प्रवाशांना व्हावी यासाठी बसस्थानकात पासवर्ड असणारे फलक लावण्यात आले आहेत. मोबाइलमध्ये वायफाय सुरू केल्यानंतर युजरनेम म्हणून ऊएरळकठअळकडठ1 व ऌ्र३ीूँ२्रल्लल्लं१ु८टरङ2014 हा पासवर्ड टाकल्यानंतर सेवेचा
लाभ घेता येतो. बसस्थानक परिसरात शंभर ते दीडशे मीटर अंतरापर्यंत कमीअधिक प्रमाणात वायफाय सुविधेला रेंज मिळते. (वार्ताहर)