पेठ आगारातून १५ बसफेऱ्यांना प्रवाशांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 17:04 IST2020-09-28T17:03:39+5:302020-09-28T17:04:53+5:30
पेठ : कोरोना काळात झालेल लॉक डाऊनमुळे थांबलेली लालपरीची चाके हळूहळू फिरू लागलीअसून पेठ आगारातून जवळपास १५ फेºया सुरू करण्यात आल्या आहेत.विशेष करून ग्रामीण व आदिवासी भागात प्रवाशांचा लाल परीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पेठ आगारातून १५ बसफेऱ्यांना प्रवाशांचा प्रतिसाद
पेठ : कोरोना काळात झालेल लॉक डाऊनमुळे थांबलेली लालपरीची चाके हळूहळू फिरू लागलीअसून पेठ आगारातून जवळपास १५ फेºया सुरू करण्यात आल्या आहेत.विशेष करून ग्रामीण व आदिवासी भागात प्रवाशांचा लाल परीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
राज्य परिवहन मंडळाच्या पेठ आगारातून टप्प्या टप्प्याने पेठ ते नाशिक, अहमदनगर, पुणे, जळगाव, दिंडोरी, हरसूल, जाहुले, घुबडसाका, भनवड, सावर्णा, आसरबारी, एकदरे, दाभाडी, बोरवठ, जांभूळमाळ आदी नियमीत फेºया सुरू करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक स्वप्नील आहिरे यांनी दिली.
आंतरराज्यीय वाहतूक सुरू
पेठ व नाशिक आगारातून नाशिक ते वापी साठी बसफेर्या सुरू करण्यात आल्याने आता प्रवाशांना आतंरराज्यीय वाहतूक सेवेचाही लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. प्रवाशांनी कोविडचे सर्व नियम पाळून सुरिक्षत सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहनही महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
(फोटो २८ पेठ १)