शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

रिक्षाचालकांसह प्रवाशांची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 1:55 AM

: शहरातील रिक्षा वाहतुकीला शिस्त लागावी, या हेतूने शहर वाहतूक नियंत्रण शाखा, आरटीओकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. रिक्षाचालकांनी रिक्षाचे मीटर कार्यान्वित ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

नाशिक : शहरातील रिक्षा वाहतुकीला शिस्त लागावी, या हेतूने शहर वाहतूक नियंत्रण शाखा, आरटीओकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. रिक्षाचालकांनी रिक्षाचे मीटर कार्यान्वित ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच २७ रिक्षा थांब्यांवरून ५४ मार्गांवर शेअर-ए-रिक्षा सेवा जाहीर करण्यात आली आहे. मात्र या सेवेमुळे रिक्षाचालकांसह प्रवाशांचीही कोंडी होत आहे. कारण आरटीओने या सेवेअंतर्गत जाहीर केलेले दर हे वाजवी नसल्याचे प्रवासी सांगत त्यानुसार पैसे देण्यास नकार देत असल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. एकूणच शहराची रिक्षा वाहतुकीच्या दराबाबत कमालीची अनिश्चितता निर्माण झाल्याचे चित्र आहे. मीटरप्रमाणे रिक्षा चालविणे रिक्षाचालकांवर बंधनकारकच आहे, मात्र शेअर-ए-रिक्षा सेवेच्या ५४ मार्गांवर मीटरची सक्ती करण्यात आली नसून किलोमीटरनुसार आरटीओने ठरवून दिलेले दर आकारण्याची मुभा दिली गेली आहे. हे दर रिक्षाचालकांच्या सोयीचे असून, प्रवाशांना डोईजड वाटत असल्याने प्रवासी त्यास नकार देत आहेत. त्यामुळे रिक्षाचालक कोंडीत सापडला आहे. यामुळे रिक्षाचालक प्रवाशांना विश्वासात घेऊन ‘खरे’ दर सांगत बसवून घेण्यास प्राधान्य देत आहे....तर रिक्षाचालक करतात कारवाईचे स्वागत!एखाद्या प्रवाशाने मीटरप्रमाणे भाडे घेण्याची मागणी केली आणि रिक्षाचालकाने ती नाकारली तर त्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि रिक्षाचालकाकडून परमिट, मूळ वाहन चालविण्याचा परवाना, बॅच, विमा, पीयूसी, गणवेश यांसारख्या बाबींची पूर्तता होत नसेल तर अशा संबंधित रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे सीबीएस परिसरातील थांब्यावरील काही रिक्षाचालकांनी सांगितले.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसauto rickshawऑटो रिक्षा