लष्कराचा रस्ता बंद झाल्याने पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:29 IST2018-02-09T23:56:03+5:302018-02-10T00:29:25+5:30

देवळाली कॅम्प : देवळाली छावणी परिषद अंतर्गत असलेला नानेगाव हा रस्ता लष्करी प्रशासनाने सर्वसामान्य वाहतुकीसाठी बंद केल्याने या मार्गाने ये-जा करणाºया विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे.

The passage of the road due to the closure of the army | लष्कराचा रस्ता बंद झाल्याने पायपीट

लष्कराचा रस्ता बंद झाल्याने पायपीट

देवळाली कॅम्प : देवळाली छावणी परिषद अंतर्गत असलेला नानेगाव हा रस्ता लष्करी प्रशासनाने सर्वसामान्य वाहतुकीसाठी बंद केल्याने या मार्गाने ये-जा करणाºया विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. परिसरातील नगरे आणि मळे भागातील विद्यार्थी या मार्गाने शाळेत ये-जा करतात. परंतु रस्ता बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना वळसा घालून शाळेत जावे लागत असल्याने त्यांची पायपीट वाढली आहे.
विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता सदर रस्ता बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी पालकांकडून होऊ लागली आहे. या मार्गावर नूतन विद्यामंदिरसह काही खासगी शाळा आहेत. या शाळांमध्ये परिसरातील विद्यार्थी शिकत आहेत. गेल्या महिनाभरापासून मार्ग बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांची पायपीट वाढली आहे.

Web Title: The passage of the road due to the closure of the army