पाच किलोमीटर पायपिटीने भाविकांचीच होणार परवड
By Admin | Updated: April 24, 2015 01:42 IST2015-04-24T01:41:40+5:302015-04-24T01:42:16+5:30
पाच किलोमीटर पायपिटीने भाविकांचीच होणार परवड

पाच किलोमीटर पायपिटीने भाविकांचीच होणार परवड
नाशिक : दक्षिण गंगा मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीत रामकुंडात स्नान करण्यासाठी लाखो भाविक येणार असले तरी त्यांना नदीपात्राकडे येणे कठीण आहे. विशेषत: पाच किलोमीटर पायपीट करावी लागणार आहे आणि त्यांनतरही त्यांना रामकुंडापेक्षा अन्यत्र घाटांवरच स्नान करावे लागणार आहे. कुंभमेळ्यासाठी जिल्हा प्रशासनाने जो आराखडा तयार केला, त्यामुळेच ही भाविकांची परवड होणार आहे. नाशिकच्या कुंभमेळ्यात रामकुंड येथेच स्नानाचे महत्त्व अधिक आहे. गोदावरी नदी रामकुंडातच दक्षिण वाहिनी होत असल्याने तेथे स्नानाचे महत्त्व मानले जाते; परंतु येणाऱ्या भाविकांना रामकुंडात अशा प्रकारचे स्नानाचे पुण्य मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी शासकीय यंत्रणा आणि पोलिसांनी जे नियोजन केले आहे, त्यानुसार शहराच्या प्रवेशद्वारावच बा' वाहनतळाची उभारणी करण्यात आली असून, खासगी प्रवासी वाहनाने येणाऱ्या भाविकांना या बा' वाहनतळावरच वाहने उभी करावी लागतील. त्यानंतर तेथून राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांनी अंतर्गत वाहनतळावर आणण्यात येणार आहे. तेथून नदीपात्र किमान पाच किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे अंतर्गत वाहनतळावरून भाविकांना पाच किलोमीटर पायपीट केल्यानंतरच गोदावरी नदीचे दर्शन होणार आहे. रामकुंडाकडे येणाऱ्या मार्गांचा खूप विचार करण्यात आला,